अभिजीत बिचुकलेला मोठा दिलासा, खंडणी प्रकरणात जामीन मंजूर

अभिजीत बिचुकलेला मोठा दिलासा, खंडणी प्रकरणात जामीन मंजूर

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात चर्चेत राहिलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले याला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने खंडणी प्रकरणात शु्क्रवारी अभिजीत बिचुकले याला जामीन मंजूर केला.

  • Share this:

किरण मोहिते, (प्रतिनिधी)

सातारा, 2 जुलै- बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात चर्चेत राहिलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले याला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने खंडणी प्रकरणात शु्क्रवारी अभिजीत बिचुकले याला जामीन मंजूर केला. आता पुन्हा बिग बॉसमध्ये जाण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या घरातच त्याला सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी चेक बाउन्सप्रकरणी अटक केली होती. साताऱ्याचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अशी अभिजीत बिचुकलेची ओळख आहे. याच ओळखीवर त्याला बिग बॉसच्या घरात एण्ट्री मिळाली होती. मात्र, आता अचानक त्याला घरातून बाहेर जावे लागले होते. चेक बाउन्सप्रकरणात सातारा न्यायालयाने बिचुकलेच्या विरोधात पकड वॉरन्ट जारी केले होते. याचप्रकरणी सातारा पोलीस मुंबईत दाखल झाले. मुंबई पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांनी बिचुकलेला अटक केली होती.

अभिजीत बिचुकले आणि वाद

'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये महिलांवर आक्षेपार्ह शेरबाजी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केली. मराठीतील एका शोमध्ये अभिजीत बिचुकलेने प्रतिस्पर्धी रुपाली भोसलेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरला होता. बिचुकलेवर कारवाई करण्याची रितू तावडेंनी मागणी केली होती. बिचुकलेला घराबाहेर काढा अन्यथा तीव्र आंदोलन छडले जाईल, असा इशारा रुपाली भोसले हिने दिली होता. बिग बॉसच्या घरात असा एकही दिवस नसेल जेव्हा अभिजीतचे कोणाशी भांडण झाले नाही, एकीकडे त्याने सुरेखा पुणेकर यांना आई मानले तर दुसरीकडे त्यांच्याचविरोधात कुरघोडी करताना दिसतो. कधी या ग्रुपमध्ये तर कधी त्या ग्रुपमध्ये जात प्रत्येक ठिकाणी वाद उकरून काढण्याचे काम सध्या तो बिग बॉसच्या घरात करत आहे.

VIDEO : मुंबईकरांनो, पुढचे चार दिवस काळजी घ्या; हवामान विभागाने दिला मोठा इशारा

Published by: Sandip Parolekar
First published: July 26, 2019, 9:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading