कोरेगाव भीमा : आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर, कोर्टाचा निर्णय

कोरेगाव भीमा : आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर, कोर्टाचा निर्णय

एल्गार परिषदेच्या आयोजनप्रकरणी प्रोफेसर आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

पुणे, 2 फेब्रुवारी : एल्गार परिषद आयोजन प्रकरणात प्रोफेसर आनंद तेलतुंबडे यांना पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर आहे, असा निर्णय पुणे कोर्ट दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे तेलतुंबडे यांना 11 फेब्रुवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे.

एल्गार परिषदेच्या आयोजनप्रकरणी प्रोफेसर आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे सत्र न्यायालयाने तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामिन नाकारला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पण आता पुणे कोर्टाने ही अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. कोर्टाचा हा निर्णय पुणे पोलिसांसाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तेलतुंबडेंवरील आरोपामध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं होतं.

कोण आहेत आनंद तेलतुंबडे?

- एल्गार परिषद आयोजन प्रकरणात सहभाग

- गोव्यातील एका संस्थेत सहाय्यक प्राध्यापक

- तेलतुंबडेंसह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल

- 28 ऑगस्टला तेलतुंबडेंच्या पुण्यातील घरावर छापा

- छाप्यात पुणे पोलिसांना काहीही हाती लागलं नाही

VIDEO : भूकंपाच्या 7 हादऱ्यांनंतर या कोरड्या पडलेल्या बोअरवेलला लागलं धो धो पाणी

First published: February 2, 2019, 4:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading