लग्नानंतर झालेल्या छळाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या, रुमालाने हात बांधून जायकवाडी धरणात घेतली उडी

सहा महिन्यांपुर्वीच या दापत्यांचा विवाह झाला होता अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 08:42 PM IST

लग्नानंतर झालेल्या छळाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या, रुमालाने हात बांधून जायकवाडी धरणात घेतली उडी

औरंगाबाद, 04 नोव्हेंबर : पैठण इथल्या जायकवाडी धरणात पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी उघडकीस आली आहे. घरातून होणाऱ्या अवहेलनेमुळे या जोडप्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. घरच्यांकडून व्यवस्थित वागणूक मिळत नव्हती. त्यामुळे सुखात सुरू असलेला संसार या जोडप्याने संपवला. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

या जोडप्याचं एकमेकांवर अतूट प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी सोबत मरण्याचा निर्णय घेतला. एकमेकांचा हात रुमालाने बांधून त्यांनी धरणात उडी घेतली. सकाळी पत्नीचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगतांना आढळुन आला होता तर दुपारनंतर पतीचा मृतदेहही आढळून आला. हे दोघेही पती-पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या अशा प्रकारे आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन विठ्ठल लंवाडे आणि किर्ती सचिन लंवाडे अशी मृत दाम्पत्यांची नावं आहेत. हे दाम्पत्य अहमदनगर जिल्ह्यातील तीसगाव तालुक्यातील पाथर्डीचे राहणारे होते. दोघे पती पत्नी पैठणला फिरण्यासाठी जातो म्हणून रविवारी दुपारी घरातून बाहेर पडले. मात्र, आज सोमवारी या दोघाचें मृतदेह जायकवाडी धरणाच्या पाण्यात तंरगतांना आढळुन आले.

सहा महिन्यांपुर्वीच या दापत्यांचा विवाह झाला होता अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या तरुण दाम्पत्याचं लग्न झाल्यानंतर किर्ता यांचाय कुटुंबीयांकडून छळ करण्यात येत होता. हा छळ पतीला सहन झाला नाही आणि म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, यावप्रकर्णी पैठण पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून आता पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या - दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, तिघा मित्रांचा जागीच मृत्यू

Loading...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रकरणाची माहिती देण्यात आली असून आता पुढील तपास करत आहेत. दाम्पत्यांच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलीस कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. तर नुकताच सुरू झालेला संसार अशा प्रकार संपल्यामुळे सगळ्यांवर शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - पतीनंतर प्रियकरानेही साथ सोडली, आता फोटोसोबत 'ती' घेणार सप्तपदी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...