Home /News /maharashtra /

बाळाचं नाव 'पंतप्रधान' ठेवलं पण झाला भलताच लोचा; 3 महिने झिजवावा लागला उंबरठा, जाणून घ्या नेमकं प्रकरण

बाळाचं नाव 'पंतप्रधान' ठेवलं पण झाला भलताच लोचा; 3 महिने झिजवावा लागला उंबरठा, जाणून घ्या नेमकं प्रकरण

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील एका दाम्पत्यानं आपल्या बाळाचं नाव पंतप्रधान असं ठेवलं होतं. पण पंतप्रधान नावामुळे बाळाच्या वडिलांना तीन महिने मोठा संघर्ष करावा लागला आहे.

    उमरगा, 18 फेब्रुवारी: उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील एका दाम्पत्यानं आपल्या बाळाचं नाव पंतप्रधान असं ठेवलं होतं. पारंपरिक पद्धतीनं त्याचं बारसं देखील घालण्यात आलं होतं. पण पंतप्रधान हे संविधानिक पदनाम असल्यानं आरोग्य विभागानं संबंधित नावानं जन्म दाखला जारी करण्यासाठी विलंब लावला होता. अखेर तीन महिन्यानंतर 'पंतप्रधाना'ला जन्मदाखला मिळाला आहे. गुरुवारी आरोग्य विभागाने पंतप्रधानाच्या वडिलांकडे जन्मदाखला सुपूर्द केला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? उमरगा तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी असणारे दत्ता आणि कविता चौधरी यांना दोन मुलं आहेत. त्यांनी पहिल्या मुलाचं नाव राष्ट्रपती तर दुसऱ्या मुलाचं नाव पंतप्रधान असं ठेवलं आहे. 19 जून 2020 रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचं नाव राष्ट्रपती ठेवल्यानंतर त्यांना या मुलाचा दाखला देखील मिळाला होता. तसेच त्यांनी राष्ट्रपतीच्या नावानं आधार कार्ड देखील तयार करून घेतलं होतं. हेही वाचा-सरप्राईझ कसला हा तर मोठा शॉक! गर्लफ्रेंडने मास्क हटवताच बॉयफ्रेंड हादरला कारण... यानंतर संबंधित दाम्पत्याला 10 नोव्हेंबर 2021 रोजी दुसरा मुलगा झाला. यावेळी चौधरी दाम्पत्यानं आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव 'पंतप्रधान' ठेवण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी धार्मिक रीती-रिवाजाप्रमाणं बारसं घालून त्याचं नामकरण केलं. त्यानंतर काही दिवसांनी बाळाचे वडील दत्ता चौधरी यांनी आपल्या मुलाचं जन्म दाखला मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडे अर्ज केला. पण पंतप्रधान नावानं जन्मदाखला कसा द्यायचा? यासाठी आरोग्य विभाग संभ्रमात पडले. त्यामुळे मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्यांनी सोलापुरातील जिल्हा निबंधक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं. हेही वाचा-80 वर्षीय आजीबाईंची इंग्लिश ऐकून घालाल तोंडात बोटं; VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ दरम्यान पंतप्रधानाचे वडील सतत कार्यालयाच्या चकरा मारत होते. गेल्या तीन महिन्यांपासून जन्म दाखला लटकावून ठेवल्यानंतर आरोग्य विभागानं अखेर जन्म दाखला दिला आहे. याबाबत माहिती देताना बाळाचे वडील दत्ता चौधरी यांनी सांगितलं की, पहिल्या मुलाचं नाव राष्ट्रपती ठेवल्यानंतर जन्म दाखला मिळवण्यासाठी कोणतीही अडवणूक झाली नाही. पण दुसऱ्या मुलाचं पंतप्रधान ठेवल्यानंतर हे संविधानिक पदनाम असल्याचं कारण देत, जन्म दाखला अडवून ठेवला होता. पण सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस 'पंतप्रधान'चा जन्म दाखला मिळाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Osmanabad

    पुढील बातम्या