Home /News /maharashtra /

हृदयद्रावक! बाराव्याला जाणाऱ्या दाम्पत्याला मृत्यूनं गाठलं; रस्त्यातच झाला दुर्दैवी अंत

हृदयद्रावक! बाराव्याला जाणाऱ्या दाम्पत्याला मृत्यूनं गाठलं; रस्त्यातच झाला दुर्दैवी अंत

प्रातिनिधिक फोटो (PTI)

प्रातिनिधिक फोटो (PTI)

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नातेवाईकाच्या बाराव्याला जाणाऱ्या एका दाम्पत्यावर काळानं घाला घातला आहे.

    कवठेमहांकाळ, 09 फेब्रुवारी: सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नातेवाईकाच्या बाराव्याला जाणाऱ्या एका दाम्पत्यावर काळानं घाला घातला आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना वाटेतच चारचाकी उलटून  त्यांचा दुर्दैवी अंत (Couple died in road accident) झाला आहे. या दुर्घटनेत अन्य चार जण गंभीर जखमी (4 people injured) झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. नातेवाईकाच्या बाराव्याला जाणाऱ्या दाम्पत्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पृथ्वीराज दौलत चव्हाण (55) आणि प्रियांका पृथ्वीराज चव्हाण (50) असं मृत पावलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. ते मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील रहिवासी होते. तर विलास महादेव माने (54), अनिता विलास माने (38, दोघेही रा. सांगली), विवेक चव्हाण (50) आणि विजया विवेक चव्हाण (45, दोघेही रा. बेळगाव) असं अपघातात जखमी झालेल्या चार जणांची नावं आहेत. या चारही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेही वाचा-भररस्त्यात पत्नीवर चाकूनं सपासप वार; डोंबिवलीतील थरकाप उडवणारी घटना, कारण समोर मिळालेल्या माहितीनुसार, सर्व अपघातग्रस्त बीड येथील आपल्या नातेवाईकाच्या बाराव्याच्या विधीसाठी जात होते. दरम्यान मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांची मोटार उलटून हा अपघात घडला आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील रहिवासी असणारे पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांची पत्नी प्रियांका चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य चौघांवर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेही वाचा-सांगली: 2चिमुकल्यांसह आईचा हृदयद्रावक शेवट, सकाळी लेकरांना घेऊन घराबाहेर पडली अन कसबे डिग्रज येथील चव्हाण दाम्पत्य, मृत पृथ्वीराज चव्हाण यांचे साडू विलास माने व विवेक चव्हाण आणि दोन मेहुण्या अनिता  माने व विजया चव्हाण यांच्यासोबत चारचाकी वाहनाने बीड येथे बाराव्याच्या विधीसाठी जात होते. दरम्यान पहाटे वाहनावरील अचानक नियंत्रण बिघडल्याने हा अपघात घडला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Road accident, Sangali

    पुढील बातम्या