प्रेमीयुगुलाने शेतात घेतला गळफास...मुलगा अवघ्या 22 तर मुलगी 18 वर्षांची!

प्रेमीयुगुलाने शेतात घेतला गळफास...मुलगा अवघ्या 22 तर मुलगी 18 वर्षांची!

शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले.

  • Share this:

सटाणा, 24 मे : प्रेमी युगलाने गळफास घेऊन केली आत्महत्त्या केल्याची घटना आज सटाणा तालुक्यातील सावरगाव येथे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करणाऱ्या मुलाचं वय 22 तर मुलीचं वय हे फक्त 18 वर्ष इतकं होतं. एका शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह घेतले ताब्यात आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पठावे ग्रामपंचायत हद्दीतील सावरपाडा येथील पुजा बंडू गांगुर्डे (18) तर पठावे येथील रवींद्र पोपट पवार (22) या प्रेमीयुगुलाने सावरपाडा शिवारातील गट नंबर 102 मध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान सदर प्रकार लक्षात आल्यानंतर पठावेचे पोलीस पाटील दयाराम पवार यांनी सटाणा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. सटाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सदरचे मृतदेह ताब्यात घेत सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.

हेही वाचा - पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पोची स्विफ्ट कारला जोरदार धडक, अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

याबाबत सटाणा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा तपास सटाणा पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई,प्रकाश जाधव पोलीस हवा.सोळंके, राहुल शिरसाठ,आदी पुढील तपास करत आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 24, 2020, 9:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading