अडीच वर्षाच्या चिमुकलीसह दाम्पत्यानं रेल्वेखाली झोकून दिलं, आई व मुलगी जागीच ठार

अडीच वर्षाच्या चिमुकलीसह दाम्पत्यानं रेल्वेखाली झोकून दिलं, आई व मुलगी जागीच ठार

धक्कादायक! दाम्पत्याने आपल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीसह रेल्वेखाली झोकून दिलं....

  • Share this:

भुसावळ, 2 सप्टेंबर: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील येथील एका दाम्पत्याने आपल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीसह रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात घटनेत आई व मुलगी जागीच ठार झाली असून पती गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना साकेगाव शिवारात घडली आहे.

हेही वाचा...आधी बोनेटला लागली आग, ड्रायव्हर बाहेर पडणार तोच लक्झरी SUVचा झाला स्फोट

साकेगाव येथील रहिवासी हरीश शिरीष चौधरी (वय- 36) यांनी पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीसह रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्यांची पत्नी आणि मुलगीचा जागीच मृत्यू झाला. हरीश चौधरी यांना गंभीर जखमी अवस्थेत डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या  गोदावरी हॉस्पिटल दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. परिसरातून जाणार्‍या लोकांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी तातडीने गावातील लोकांना याबाबतची माहिती दिली. लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत असणार्‍या हरीश चौधरी यांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

हेही वाचा..6 महिन्यात तब्बल 12 वेळा बदललं कोरोनानं रुप, कशी तयार होणार प्रभावी लस?

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. महिला आणि तिच्या अडीच वर्षांच्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हरीश चौधरी यांनी आपल्या कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत भुसावळ तालुका पोलिस शोध घेत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 2, 2020, 12:29 PM IST

ताज्या बातम्या