मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Corona Virusची दहशत, शिंकला म्हणून बाईकस्वाराला दाम्पत्याने धो-धो धुतलं

Corona Virusची दहशत, शिंकला म्हणून बाईकस्वाराला दाम्पत्याने धो-धो धुतलं

सध्या कोरोनाची राज्यात मोठी दहशत पसरली आहे. सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या कोरोनाची राज्यात मोठी दहशत पसरली आहे. सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या कोरोनाची राज्यात मोठी दहशत पसरली आहे. सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
कोल्हापूर, 19 मार्च: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. आतापर्यंत 49 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे तर राज्यात एकाचा बळी घेतला आहे. सध्या कोरोनाची राज्यात मोठी दहशत पसरली आहे. सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कोल्हापुरात शिंकल्यावरुन एका दुचाकीस्वाराला दाम्पत्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ही घटना कोल्हापुरातील गुजरी गल्लीत घडली. दाम्पत्य दुचाकीवरुन जात होतं. त्यांच्या शेजारुन जाणारा दुचाकीस्वाराला अचानक शिंक आली. शिंकलास का, असा जाब विचारत दाम्पत्याने दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हेही वाचा...CBSE बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या नाहीत, वेळापत्रकानुसार घेण्यात येतील दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या 166 झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळा, एकाच ठिकाणी जास्त गर्दी करु नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. हेही वाचा...मुंबईत 22 वर्षीय तरुणीसह आणखी एका महिलेला कोरोनाची लागण, राज्यात आकडा 49वर कोरोनाला रोखण्यााठी सरकारने केले मोठे बदल 1. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. 2. रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 3. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल. 4. दुकानांच्या वेळा ठरविणार शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल. 5. साधनसामुग्रीची उपलब्धता दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.
First published:

Tags: Kolhapur, Maharashtra news

पुढील बातम्या