यवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं

यवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं

यवतमाळमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पुसद इथं ९ देशी कट्टे जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 16 ऑक्टोबर : यवतमाळमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पुसद इथं ९ देशी कट्टे जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून गुन्हेगारांचे धाबे दणाणलेत.

पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात अत्याधुनिक शस्त्रांचा शिरकाव झाल्याचं सिद्ध झालं आहे. तर याने यवतमाळमध्ये गुन्हेगारीला किती वाढली आहे हेच समोर येतं.

अकोला येथील काही तरुण देशी कट्टे विक्रीसाठी पुसद इथे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला. पुसदमध्ये रात्रभर गस्त घालण्यात आली. तेव्हा १४ ऑक्टोबर उमरखेड-पुसद मार्गावरील श्रीराम पार्कजवळ काही संशयित तरुण आढळून आले. त्यावरून त्यांची चौकशी केली गेली आणि झडती घेतली असता त्यांच्या जवळ ९ देशी कट्टे आणि १६ जिवंत काडतुसं आढळून आली.

तात्काळ या तरुणांना ताब्यात घेतलं गेलं आणि त्यांच्या जवळचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुसद पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. यामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी केली असता अवैध पद्धतीने देशी कट्ट्यांचा वापर करणाऱ्या अनेक लोकांची नावं पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलीस या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत.

VIDEO: तोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग

 

First published: October 16, 2018, 1:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading