बीड, 14 नोव्हेंबर : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील (marathawada rain) शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून गेली. शेतकऱ्यांनी कशीबशी हाती आलेली कपाशी विकली आहे. पण, चोरट्यांनी त्यावरही डल्ला मारला. बीड (beed) जिल्ह्यातील गेवराईत (gevarai) जिनिंगमधील कापसाची (cotton) चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कापूस चोरतांना चोरटे सीसीटीव्ही (cctv video) कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
बीड जिल्ह्यात चोरट्यांनी आता शेतीमालाकडे मोर्चा वळवला आहे. आतापर्यंत शेतातील गोठ्यातून शेतातून शेतीमाल चोरल्याच्या घटना घडत होत्या. मात्र आता गेवराईत चक्क जिनिंगमधील कापसावरचं चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
बीडमध्ये चोरांनी वळवला शेतमालाकडे मोर्चा, कापूस चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/fSorHSUHHE
— News18Lokmat (@News18lokmat) November 14, 2021
गेवराई परिसरातील महामार्गालगत असणाऱ्या, गिरिजाशंकर जिनिंगमधील कापसाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. रात्री 12 च्या दरम्यान जिनिंगमधील 12 ते 14 क्विंटल कापूस चोरून चोरट्यांनी जवळपास 1 लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
पत्नीसोबत अवैध संबंधातून पतीने रचला कट; दाम्पत्याने मजुराला दिला भयावह शेवट
हा चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, नेहमी सोनं, चांदी, वाहनं चोरणाऱ्या चोरट्यांनी, आता शेतीमालाकडे मोर्चा वळवला. त्यामुळं शेतकऱ्यांसह धान्य व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ आळा घालावा, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Theft