मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जीएसटीमुळे विठुरायाचा प्रसादही महागणार

जीएसटीमुळे विठुरायाचा प्रसादही महागणार

जीएसटी लागू झाल्यानंतर तोटा भरून काढण्यासाठी 2 रुपयांनी किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

जीएसटी लागू झाल्यानंतर तोटा भरून काढण्यासाठी 2 रुपयांनी किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

जीएसटी लागू झाल्यानंतर तोटा भरून काढण्यासाठी 2 रुपयांनी किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

10 जुलै:पंढरीच्या पांडुरंगाचा प्रसाद म्हणून गेल्या काही वर्षात प्रचलित झालेला बुंदीचा लाडू आता महागणार आहे. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर तोटा भरून काढण्यासाठी 2 रुपयांनी किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

पंढरपूर हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत मानाचं तीर्थक्षेत्र. आषाढी, कार्तिकीला पंढरपुरात भाविकांची गर्दी होते. पंढरीस येणारे भाविक प्रसाद खरेदी करण्यासाठीही मोठी गर्दी करतात.

हा प्रसाद पंढरपूर मंदिर समिती 'ना नफा ना तोटा' तत्वावर 5 रुपयाला देते. तरीही प्रती लाडू दीड ते दोन रुपयांचा तोटा मंदिर समितीला सोसावा लागतोच. समिती वर्षभरात जवळपास 90 लाख लाडू विक्रीसाठी तयार करते.

देशात जीएसटी करप्रणाली लागू झालीय. हरभरा डाळ, तेल आणि साखरेवर 5 टक्के कर बसणार आहे.त्यामुळे ना नफा ना तोटा तत्वावर लाडू द्यायचे असल्यास प्रसादाच्या किमतीत वाढ करावी लागणार असल्याचं मंदिर समितीचं म्हणणं आहे. दरवाढीवर अंतिम निर्णय समितीच्या बैठकीत घेतला जाईल.

First published:

Tags: Maharashtra, Pandharpur, विठ्ठल