गोदामातल्या धान्याला फुटले पाय, 81 लाखांचा घोटाळा

गोदामातल्या धान्याला फुटले पाय, 81 लाखांचा घोटाळा

शासनाकडून गोरगरिबांसाठी स्वस्त दरात धान्य दिले जाते. मात्र, बीडमध्ये स्वस्त धान्य गोदामात स्वतः गोदामपालानेच घोटाळा केला असल्याचं तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत समोर आलंय

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 16 जुलै: शासकीय धान्य गोदामातल्या धान्याचा  धान्याचा काळाबाजार करुन गोदाम पालाने लाखोंचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. भरण्याचा प्रकार बीड मध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणी आज गोदामपालाच्या  विरोधात 81 लाख 15 हजार 403 रुपये किमतीच्या धान्याचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातील पेठ बीड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोदामपाल दिलीप लक्ष्मण भडके याने हा अपहार केला असल्याचं उघड झालं आहे.

तिने मुलांना कुशीत घेतल्याने मुलं बचावली पण तिचा मात्र जीव गेला

शासनाकडून गोरगरिबांसाठी स्वस्त दरात धान्य दिले जाते. मात्र, बीडमध्ये स्वस्त धान्य गोदामात स्वतः गोदामपालानेच घोटाळा केला असल्याचं तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत समोर आलंय . तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्या पथकाने 2 महिन्यापूर्वी बीड गोदामात जाऊन तपासणी केली होती. विशेष म्हणजे ज्या दिवशी तहसीलदारांचे पथक बीड गोदामाची तपासणी करण्यास गेले तेव्हा दिलीप भडके हा गोदामपाल जाणीवपूर्वक गैरहजर राहिला.

'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स

अखेर तहसीलदार यांच्या पथकाने कुलूप तोडून गोदामातील धान्याचा पंचनामा केलाय यात 81 लाख 15 हजार 403 रुपयांचे वेगवेगळ्या योजनेतील स्वस्त धान्य कमी असल्याचं आढळून आलं. ही गंभीर बाब बीड तहसीलदारांनी वरिष्ठांना गोपनीय अहवालाद्वारे कळवली होती याची गंभीर दखल घेत पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलीय. नायब तहसीलदार संजीव राऊत यांच्या फिर्यादीवरून बीडचे गोदामपाल आरोपी दिलीप भडकेच्या विरोधात शासकीय स्वस्त धान्य गायब केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाकरण्यात आला आहे. गोदामपाल भडके फरार असून पेठ बीड पोलीस तपास करत आहेत.

अशी आढळली तफावत

तांदूळ - 21119.50 (क्विंटलमध्ये)

साखर - 88.22

तूर डाळ - 22.50

चना डाळ - 22.22

उडीद डाळ - 14.28

Tags:
First Published: Jul 16, 2019 07:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading