Breaking: माजी नगरसेवक पुत्राची युवकाला जबर मारहाण, एक डोळा केला निकामी

Breaking: माजी नगरसेवक पुत्राची युवकाला जबर मारहाण, एक डोळा केला निकामी

नाशिक शहरात एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. माजी नगरसेवक पुत्र आणि जमावानं ही बेदम मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 25 ऑक्टोबर : नाशिक शहरात एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. माजी नगरसेवक पुत्र आणि जमावानं ही बेदम मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत आहे. या मारहाणीत युवकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

जुन्या भांडणाची कुरापत काढून मध्यरात्रीच्या सुमारास युवकावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात युवकाचा डोळा निकामी झाला आहे तर दुसऱ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

जखमी युवकाला एका खासगी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नगरसेवक पुत्र आणि त्याच्या जमावाने युवकाच्या चारचाकी वाहनाचं देखील प्रचंड नुकसान केलं. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी झाले दाखल आहेत. मात्र अद्यापही यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

रात्रीच्या सुमारास युवकावर हल्ला करून संशयित फरार झाले आहेत. या प्रकरणी सातपूर पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.

LIVE VIDEO: स्फोटात दोघांचा मृत्यू तर बाकी जण जीव मुठीत घेऊन पळाले

First published: October 25, 2018, 11:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading