मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

malegaon violence : मालेगाव हिंसाचार प्रकरणी नगरसेवकाला अटक, व्हिडीओ केले होते व्हायरल

malegaon violence : मालेगाव हिंसाचार प्रकरणी नगरसेवकाला अटक, व्हिडीओ केले होते व्हायरल

हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे 4 गुन्हे दाखल करून सुमारे तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त संशयितांना आरोपी केले आहे.

हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे 4 गुन्हे दाखल करून सुमारे तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त संशयितांना आरोपी केले आहे.

हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे 4 गुन्हे दाखल करून सुमारे तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त संशयितांना आरोपी केले आहे.

मालेगाव, 15 नोव्हेंबर : त्रिपुरा कथित हिंसाचार प्रकरणावरून मालेगावमध्ये बंदला हिंसक (Malegaon violence) वळण मिळाले होते. या प्रकरणी आता अटक सत्र सुरू झाले आहे. या प्रकरणी नगरसेवक अय्यज अहमद (Corporator Ayyaj Ahmed) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 18 जणांना अटक केली आहे तर अडीच हजार संशयितांवर गुन्हे दाखल केले आहे आज दुपारी मालेगाव पोलिसांनी नगरसेवक अय्यज अहमद यांना अटक केली.  त्रिपुरातील घटनेचे वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल करण्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. मालेगावला शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे 4 गुन्हे दाखल करून सुमारे तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त संशयितांना आरोपी केले आहे. त्यात रझा अकादमीचे डॉ.ईस रिझवी, सलीम रिझवी,अकिल रिझवी, जनता दलाचे महासचिव मुश्तकिन डिग्नेटी, मालेगाव पावरलूम असोसिएशनचे अध्यक्ष युसूफ इलियास आदींसह काही राजकीय नेत्यांचा समावेश आहे. चिरंजीवीसोबत सलमान करणार डान्स; या सिनेमातून करणार टॉलीवूडमध्ये एंट्री या सर्व संशयितांवर दगडफेक, तोडफोड, दंगल, सरकारी कामात अडथळा आदी ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी 18 संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींची धरपकड सुरू केली आहे. मालेगावात वातावरणात पूर्णपणे शांत असून सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहे. कोणीही अफवा पसरवू नये सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो,व्हिडीओ, मॅसेज  टाकणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिला. अमरावतीत भाजपच्या माजी आमदारासह 14 जणांना अटक तर, अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (anil bonde arrest) यांना अटक केली. बोंडे यांच्यासह आतापर्यंत भाजपच्या (bjp) 14 नेते आणि पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. T20 World Cup : एरॉन फिंच, एमएस धोनी आणि दुबई.... तिघांमध्ये आहे खास कनेक्शन! सिटी कोतवाली पोलिसांनी आज अनिल बोंडे यांना अटक केली आहे. इतकंच नाहीतर आणखी काही भाजप नेत्यांना अटक करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. बोंडे यांच्यासह महापालिकेचे गटनेते तुषार भारती, भाजप जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बंद आणि हिंसाचार प्रकरणी शहरात आतापर्यंत 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या