ठाणेकऱ्यांना धोक्याची घंटा, रिपोर्टिंग करता करता 2 पत्रकारांनाही झाली कोरोनाची लागण

ठाणेकऱ्यांना धोक्याची घंटा,  रिपोर्टिंग करता करता 2 पत्रकारांनाही झाली कोरोनाची लागण

तबलिगी ज्या हॉस्पिटलमध्ये निरिक्षणाखाली होते. याच ठिकाणी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे.

  • Share this:

ठाणे, 13 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. मुंबई लगतच्या उपनगरातही कोरोना पसरत चालला आहे. ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून समूह संसर्ग म्हणजे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होत असल्यामुळे ठाण्यासाठी धोक्याची घंटा वाजली आहे.

ठाण्यात मुंब्रा इथं तबलिगी जमातीच्या लोकांना ताब्यात घेवून त्यांना मुंब्य्रातील काळसेकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तबलिगी या हॉस्पिटलमध्ये निरिक्षणाखाली होते. याच ठिकाणी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी असलेले पोलीस, पत्रकार आणि राजकीय मंडळी यांना सुद्धा आता कोरोनाची  लागण झाली आहे.

ठाण्यात गेल्या 48 तासात 2 पत्रकार, 5 ते 6 राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 पेक्षा जास्त झाल्याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा -राज्यातील 40 बेपत्ता तबलिगींना शोधण्यात पोलिसांना यश, 18 जणांचा शोध अद्याप सुरू

धक्कादायक म्हणजे, ठाण्यातील जवळपास 38 पत्रकार, 20 पोलीस आणि 30 राजकीय नेते कार्यकर्ते यांचा अहवाल थोड्याच वेळात येणार असून यात आता कोणाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात कोणाचे निगेटिव्ह याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संस्थेमार्फत या सर्वांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती.

जितेंद्र आव्हाडांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांनी कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. आव्हाड यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. तरीही खबरदारी म्हणून आव्हाड यांनी  स्वत:ला होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोकं हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले होते. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे.

हेही वाचा -पुण्यातले सगळे खासगी डॉक्टर आता सरकारच्या आधीन, कोरोना रुग्णांवर उपचार करणार

ठाण्यातील या कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील एक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर आता सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

First published: April 13, 2020, 4:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या