कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या MRI रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, संपूर्ण शरीरात झाला पस

कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या MRI रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, संपूर्ण शरीरात झाला पस

महिलेला कंबरदुखीचा त्रास सुरू झाला म्हणून रुग्णालयात गेली MRI रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली.

  • Share this:

औरंगाबाद, 24 डिसेंबर : कोरोनाचं नवं रूप समोर आल्यानंतर मोदी सरकारसोबतच जगाची चिंता वाढली आहे. याचदरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. औरंगाबादमधील एका महिलेला कोरोना झालेला कळला नाही मात्र कंबरदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर काढलेल्या रिपोर्टमधून धक्कादायक बाब समोर आली आणि डॉक्टर देखील चक्राऊन गेले. आतापर्यंत भारतात अशी ही पहिलीच केस सापडली असून याआधी जर्मनीत 6 रुग्ण आढळल्याचं देखील डॉक्टरांनी दावा केला आहे.

औरंगाबादच्या बजाजनगर परिसरात राहणाऱ्या महिलेला कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला होता. हा त्रास खूप जास्त भयंकर वाटत होता. वारंवार उपचार घेऊनही बरं होत नसल्यानं डॉक्टरांनी या महिलेला MRI करण्याचा सल्ला दिला. या MRI च्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली. या महिलेल्या संपूर्ण शरीरात पस तयार झाला होता. त्यामुळे या महिलेला वारंवार कंबरदुखीचा त्रास जाणवत होता.

डॉक्टरांनी या महिलेची कोरोना टेस्ट केली मात्र ती निगेटिव्ह आली पण महिलेच्या शरीरात अॅन्टीबॉडी आढल्यानं कोरोना होऊन गेला मात्र तो महिलेला कळला नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या महिलेला 28 नोव्हेंबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे वाचा-कट मारल्याच्या वादातून रिक्षाचालकानं बाईकस्वाराला उडवलं, मुंबईतील अपघाताचा VIDEO

डॉक्टरांनी तीन वेळा शस्त्रक्रिया करून या महिलेच्या शरीरातील पस काढला आहे. या महिलेवर उपचार करून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र अशा प्रकारची घटना भारतात पहिल्यांदाच समोर आली आहे. कोरोना होऊन गेल्यानंतर त्याचा अशा पद्धतीनं होणारा परिणाम धक्कादायक आहे. अशा प्रकारच्या 6 केसेस जर्मनीमध्ये सापडल्या होत्या अशी माहिती मिळाली आहे. तर आता ब्रिटेन आणि दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या कोरोनाच्या नव्या स्टेनमुळे जगाची चिंता वाढली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 24, 2020, 9:37 AM IST

ताज्या बातम्या