'आपण कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये आहोत', अकोल्यातील जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य

'आपण कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये आहोत', अकोल्यातील जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य

कोरोनापासून दूर असलेल्या अकोल्यात मागील 24 तासांपासून दोन रुग्ण सापडल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्येही काहीसं चिंतेचं वातावरण आहे.

  • Share this:

अकोला, 8 एप्रिल : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शिरकाव झालेल्या कोरोना व्हायरसे अकोल्यातही दोन रुग्ण सापडले आहेत. यातील पहिला रुग्ण अकोल्यातील बयदपुरा भागातील आहे तर दुसरा रुग्ण अकोट पाईल परिसरातील आहे. आतापर्यंत कोरोनापासून दूर असलेल्या अकोल्यात मागील 24 तासांपासून दोन रुग्ण सापडल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्येही काहीसं चिंतेचं वातावरण आहे.

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आवाहन केलं आहे. मात्र हे आवाहन करताना जिल्हाधिकारी पापळकर यांनी आपण कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये असल्याचं म्हटलं आहे. तसंच लोकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

'आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार अकोल्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. मात्र अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण आपण सध्या कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये आहोत. अशा स्थितीत कोरोनाचा रुग्ण सापडणं साहजिक आहे. पण आपण घरात बसलं पाहिजे. कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडता कामे नये, तरंच आपण यातून वाचू शकतो. स्वत:ही घरात बसावं, इतरांनाही याबाबत सांगावं,' असं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रातील राज्यपालांवर शरद पवार नाराज? मोदींसोबतच्या चर्चेत मांडला 'हा' मुद्दा

दरम्यान, कोरोना रुग्ण तपासणीबाबत आज सकाळी हाती आलेल्या अहवालानुसार आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे. हा भागही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली होती.

अकोल्यात काल सायंकाळी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. एम्सच्या अहवालानंतर याबाबत खुलासा झाला. अकोला शहरातील बयदपुरा भागातील रुग्ण असल्याची माहिती समोर आली. पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरापासून पाच किलीमोटर पर्यंत सर्व घरांची तपासणी करण्यात आली.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2020 06:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading