मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आता या वेगळ्या पद्धतीने दिली जाणार कोरोना लस, राज्यात याठिकाणी सुरू आहे चाचणी

आता या वेगळ्या पद्धतीने दिली जाणार कोरोना लस, राज्यात याठिकाणी सुरू आहे चाचणी

आता कोरोना लस आता नाकावाटे देण्याच्या प्रयोग करण्यात येणार आहे. याबाबत देशभरात एकूण चार ठिकाणी चाचणी सुरू आहे. त्यापैकी नागपूर हे एक ठिकाण आहे

आता कोरोना लस आता नाकावाटे देण्याच्या प्रयोग करण्यात येणार आहे. याबाबत देशभरात एकूण चार ठिकाणी चाचणी सुरू आहे. त्यापैकी नागपूर हे एक ठिकाण आहे

आता कोरोना लस आता नाकावाटे देण्याच्या प्रयोग करण्यात येणार आहे. याबाबत देशभरात एकूण चार ठिकाणी चाचणी सुरू आहे. त्यापैकी नागपूर हे एक ठिकाण आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

तुषार कोहळे, नागपूर, 06 मार्च: देशभरात कोरोना लसीकरणाचा (Coronavirus Vaccination Drive) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये 60 वर्षावरील सामान्य नागरिकांना आणि अन्य काही आजार असणाऱ्या 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेक नेतेमंडळी, कलाकार आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांनी देखील कोरोना लस टोचून घेतली आहे. दरम्यान आता कोरोना लस आता नाकावाटे देण्याच्या प्रयोग करण्यात येणार आहे. याबाबत देशभरात एकूण चार ठिकाणी चाचणी सुरू आहे. त्यापैकी नागपूर हे एक ठिकाण आहे

कोरोना लस नाकावाटे देण्यासंदर्भात चाचणी सुरू आहे. देशातील चार ठिकाणांपैकी एक असणाऱ्या नागपूरमध्ये देखील याबाबत चाचणी सुरू आहे. नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये याबाबत चाचणी सुरू आहे. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीच्या चाचणीमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीचा वापर केला जाणार आहे. ही लस नाकावाटे थेट फुप्फुसात जाते. नाकावाटे लस दिल्याने थेट फुफूसात जाते असल्यामुळे अधिक चांगली रोगप्रतिकार निर्माण होते असा दावा केला जात आहे. दरम्यान नागपूरसह देशभरात हैदराबाद, भुवनेश्वर आणि पाटणा याठिकाणी सध्या याप्रकारची नाकावाटे लस देण्याची चाचणी सुरू आहे.

(हे वाचा-वुहान दौऱ्यावेळी WHO नं केली पहिल्या कोरोना रुग्णासोबत चर्चा, धक्कादायक खुलासा)

दरम्यान नागपूरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. गेल्या 24 तासात 1393 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 9 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी नागपूर मध्ये कोरोना रुग्णांनी 1000 चा आकडा पार केल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. नागपूरमध्ये सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजार 432 आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून त्यातील निर्बंधाची मर्यादा 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान आजपासून नागपूरमध्ये पुन्हा एकदा दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्व व्यवहार बंद असणार आहेत. यामध्ये केवळ अंडी-मांस विक्रेत्यांना सूट देण्यात आली आहे.

First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona vaccination, Covid19, Nagpur