पुण्यातील संख्या वाढली, कोरोनाची लक्षणं नसूनही एकाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

पुण्यातील संख्या वाढली, कोरोनाची लक्षणं नसूनही एकाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

पुण्यात असे कितीजण कोरोना वाहक बनून फिरत आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Share this:

पुणे, 20 मार्च : पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली असून ही संख्या आता 21 वर पोहोचली आहे. पुण्यात स्कॉटलँडवरून एक संशयित पॉझिटिव्ह निघाला आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये फिलीपाईन्स रिटर्नची टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आहे.

फिलीपाईन्सवरून आलेले दोन्हीही भाऊ कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यातील एकामध्ये कोरोनाची लक्षणं नसूनही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुण्यात असे कितीजण कोरोना वाहक बनून फिरत आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. आज मुंबई आणि पुण्यात आणखी 3 रुग्ण आढळून आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा- रुग्णालयातून पळालेला कोरोना संशयित डॉक्टर बेशुद्ध, आता आहे व्हेंटिलेटरवर

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली. कोरोना आजार बरा होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. जे रुग्ण दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल, पण त्यांना होम क्वारांटाइन राहावे लागेल, अशी दिलासादायक माहिती टोपे यांनी दिली.

मात्र, महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई, पिंपरी आणि पुण्यात आणखी 3 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ही 52 वर पोहोचली आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.

First published: March 20, 2020, 12:46 PM IST

ताज्या बातम्या