ठाण्याचा धोका वाढल्याने केंद्रीय पथक आढाव्यासाठी दाखल; लॉकडाऊन कडक करण्याचा सल्ला

ठाण्याचा धोका वाढल्याने केंद्रीय पथक आढाव्यासाठी दाखल; लॉकडाऊन कडक करण्याचा सल्ला

Coronavirus चा प्रादुर्भाव ठाणे जिल्ह्यात वाढल्यामुळे केंद्रीय पथक पाहणीसाठी ठाण्यात दाखल झालं.

  • Share this:

ठाणे, 25 एप्रिल : Coronavirus चा प्रादुर्भाव ठाणे जिल्ह्यात वाढल्यामुळे केंद्रीय पथक पाहणीसाठी ठाण्यात दाखल झालं. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीनं सर्वेक्षण आणि संस्थात्मक क्वारंटाइन करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना या पथकाने दिल्या आहेत.

ठाण्यात आज 11 करोनाबाधित रुग्ण दिसून आले. आतापर्यंत ठाण्यात एकूण 198 करोनाग्रस्त दिसून आले. 2 करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरात एकूण 8 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा आकडा याहून मोठा आहे.

वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय स्तरावरील पथक ठाणे जिल्ह्यात आले आहे. या केंद्रीय पथकाने सकाळी कौशल्य हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रूग्णालय, होरायझन हॉस्पिटल या COVID हॉस्पिटल्सला भेट दिली. तसंच पारसिक नगर कळवा, अमृतनगर, मुंब्रा या ठिकाणी भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी केल्या.

केंद्रीय मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे मनपाच्या बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत कोविड 19 ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला.

वाचा - पुण्यात धोका वाढला! खासगी हॉस्पिटल्स, कॉलेजेस आणि हॉटेल्स सरकार ताब्यात घेणार

यावेळी बोलतांना जोशी म्हणाले, "सर्व विभाग समन्‍वयाने काम करीत आहेत, ही समाधानाची बाब असली तरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जास्तीत जास्त संशयितांची तपासणी करण्यात यावी. प्रत्येक क्षेत्रातील फिवर क्लिनिकच्या ठिकाणी योग्य ती दक्षता घेण्यात यावी. तसेच संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा. विशेषत: झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे."

सार्वजनिक स्वच्छतागृह वापरली जातात अशा वस्त्यांमध्ये अधिक काळजी घेण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसंच कोव्हीड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात यावी. कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांना देखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

प्रत्येक मनपाने आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी अन्‍न–धान्‍याचे वितरण व्‍यवस्थित करावे आणि नागरिकांमध्‍ये असलेली भीती घालवून विश्‍वास निर्माण करावा, असं जोशी यांनी सांगितलं.

वाचा - कोरोनाच्या 69 रुग्णांना थेट फूटपाथवर केलं उभा, वाचा नेमकी कुठं घडली घटना

प्रारंभी ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल यांनी ठाणे महानगर पालिकेची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. ठाणे शहरात प्रमाण अधिक असलेल्या भागाची लोकसंख्या आणि इतर कारण यांवर माहिती दिली. प्रशासनाने अगदी सुरुवातीपासूनच खबरदारी व दक्षता घेतली आहे. मनपाने अतिशय सूक्ष्म नियोजन केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरातील सर्व रुग्णालयं सक्षम केली आहेत. विविध पथकं निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रातप्रभावीपणे सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्यात येत असल्याचं सांगितलं.

ठाणे जिल्ह्यात आरोग्य, पोलिस, महसूल प्रशासन हे संयुक्तपणे काम करीत आहे. सर्व महानगरपालिका तसेच हॉस्पिटलमध्ये पुरेशा प्रमाणात सर्व सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मनपांचे वैद्यकीय आधिकारी, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अन्य बातम्या

चपलांमार्फत पसरू शकतो कोरोनाव्हायरस, संशोधनात धक्कादायक बाब समोर

लॉकडाऊनमध्ये बंद असणाऱ्या खासगी दवाखान्यांना सरकारनं दिला कठोर इशारा

First published: April 25, 2020, 8:04 PM IST

ताज्या बातम्या