Coronavirus Latest : महाराष्ट्रात कहर सुरूच! आजही कोरोनाबळींचा उच्चांक

Coronavirus Latest : महाराष्ट्रात कहर सुरूच! आजही कोरोनाबळींचा उच्चांक

गेल्या 24 तासांत 105 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. मृतांमध्ये फक्त मुंबईच नव्हे तर राज्यभरातल्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता हा विषाणू राज्यभर पसरतोय का अशी भीती निर्माण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे :महाराष्ट्रात Coronavirus चं थैमान सुरूच आहे. मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल  2190 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. गेल्या 24 तासांत 105 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. मृतांमध्ये फक्त मुंबईच नव्हे तर राज्यभरातल्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता हा विषाणू राज्यभर पसरतोय का अशी भीती निर्माण झाली आहे.

आज मृत्युमुखी पडल्याची नोंद झालेल्या 105 पैकी 32 मुंबईतले तर 9 पुण्यातले रुग्ण आहेत. एक रुग्ण गुजरातचा आहे.  आतापर्यंत 1897 जणांचा या कोरोनाच्या साथीत बळी गेला आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे.

आज कोरोनाबळींची संख्या 105

मुंबई 32

ठाणे 16

जळगाव 10

पुणे 9

नवी मुंबई 7

रायगड 7

अकोला 6

औरंगाबाद 4

नाशिक 3

सोलापूर 3

सातारा 2

अहमदनगर 1

नागपूर 1

नंदुरबार 1

पनवेल 1

वसई-विरार 1

राज्य सरकारने बुधवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 56948 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात देशात झालेल्या चाचण्यांच्या 12 टक्के चाचण्या झाल्या आहेत. राज्यभरात घरी विलगीकरणात असलेले (Home Quarantine) 5 लाख 82 हजार 701 जण आहेत तर 37761 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quaratine) ठेवण्यात आलं आहे.

आज दिवसभरात

नवे रुग्ण 2190

मृत्यू--105

एकूण मृत्यू-- 1897

एकूण- 56948

अन्य बातम्या

कोरोनाच्या संकटात या राज्याचं मोठं पाऊल; 47000 कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार

Lockdown मध्ये वडिलांना सायकलवरुन नेणाऱ्या ज्योतीची संघर्षकथा मोठ्या पडद्यावर

फक्त 2 आठवड्यात तब्बल 65 लाख लोकांची कोरोना टेस्ट; वुहानने नेमकं केली तरी कशी?

First published: May 27, 2020, 8:51 PM IST

ताज्या बातम्या