Home /News /maharashtra /

राज्यात कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वाढ; पुणे, ठाण्याला सर्वाधिक धोका

राज्यात कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वाढ; पुणे, ठाण्याला सर्वाधिक धोका

देशात नव्या कोरोनाव्हायरसनं (new coronavirus) शिरकाव केल्यानंतर आता राज्यातील रुग्णांची आकडेवारीही वाढू लागली आहे.

    मुंबई, 29 डिसेंबर : एकिकडे देशात नव्या कोरोनाव्हायरसमुळे चिंता वाढली आहे, तर दुसरीकडे आता राज्यात (Maharashtra Coronavirus Updates) कोरोनाच्या नव्या रुग्णांची आकडेवारी पुन्हा वाढू लागली आहे. मृतांच्या संख्येतही वाढ (Covid-19 deaths) झाली आहे. विशेषत: ब्रिटन रिटर्न नागरिकांमुळे पुणे आणि ठाण्याचा धोका सर्वाधिक वाढला आहे. गेल्या 24 तासांत 68 जणांचा कोरोना व्हायरसमुळे (Covid-19 deaths) मृत्यू झाला आहे. सोमवारी ही संख्या 50 होती. तर नव्यानं नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्याही आता  2,498 वरून 3,018 वर पोहोचली आहे. राज्यातील एकूण 19,25,066 रुग्णांपैकी सध्या  54,537 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे पुणे आणि ठाण्यात आहेत. पुण्यात 13920 तर ठाण्यात 10301 रुग्ण उपचार घेत आहेत. भारतातील सर्वाधिक कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यातच आहेत. देशातील 5.3 टक्के कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत समोर आली आहे. कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचे जरी प्रमाण जास्त असले तरी बरे होण्याचे प्रमाणही याच जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुण्यावरील संकट अजूनही कायम असल्याचं चित्र आहे. हे वाचा - ब्रिटनमधील स्ट्रेनपेक्षाही घातक कोरोना भारतात तयार होऊ शकतो; सरकारनं केलं सावध त्यात आता भारतात नव्या कोरोनानं शिरकाव केला आहे. हा कोरोनाव्हायरस अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे ब्रिटनहून आलेल्या नागरिकांची नीट तपासणी केली जाते आहे. अशा परिस्थितीत पुण्यात ब्रिटनहून परतलेल्या 106 जणांचा पत्ताच सापडत नाही आहे. त्यामुळे आता सरकार आणि प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. पुण्याचा धोका वाढण्यमागे हे महत्त्वाचं कारण ठरू शकतं. हे वाचा - नव्या कोरोनाच्या दहशतीत मोदी सरकारने corona vaccine बाबत दिली Positive News आतापर्यंतची आकडेवारी राज्यातली कोरोना रुग्णांची आजपर्यंतची संख्या 19,25,066 गेल्या 24 तासांत राज्यात झालेले मृत्यू - 68 आजच्या घडीला उपचाराधीन रुग्णसंख्या - 54,537 गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना निदान झालेले रुग्ण - 3,018 राज्याचा मृत्यूदर - 2.56%%
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या