कोरोनाच्या संकटात दिसला दानशूर महाराष्ट्राचा चेहरा; 15 दिवसात जमले 245 कोटी

Coronvirus विरोधातल्या लढ्यात महाराष्ट्रातल्या जनतेने मोलाची मदत केली आहे. दोन आठवड्यात मुख्यमंत्री साहायत्ता निधीमध्ये 245 कोटींची रक्कम जमा झाली आहे. तुम्हालाही या लढाईत योगदान द्यायचं असेल तर कुठे द्यायचा निधी?

Coronvirus विरोधातल्या लढ्यात महाराष्ट्रातल्या जनतेने मोलाची मदत केली आहे. दोन आठवड्यात मुख्यमंत्री साहायत्ता निधीमध्ये 245 कोटींची रक्कम जमा झाली आहे. तुम्हालाही या लढाईत योगदान द्यायचं असेल तर कुठे द्यायचा निधी?

  • Share this:
    मुंबई, 16 एप्रिल : Coronavirus विरोधातल्या लढ्यात आता महाराष्ट्रातील जनता सहकारबरोबर सहभागी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर मदतीचे शेकडो हात पुढे आले आणि त्याचाच परिणाम म्हणून अवघ्या काही दिवसात मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 245 कोटी रुपये जमा झाले आहेत. कोराना विषाणुविरुद्ध लढतांना आपली एकजूट, सहकार्याचे हात आणि मोलाची साथ मला अपेक्षित आहे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. याच भावनेला राज्यातील दानशूर जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आणि या विषाणुविरुद्ध लढण्याची तयारी दाखवली. ज्यांना जी जी मदत करणे शक्य होते त्यांनी त्या मदतीसाठी हात पुढे केले. मदतीचे धनादेश, वस्तू, अन्नधान्याचा पुरवठा अशा स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला. गोरगरीब, लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या जनतेच्या जेवणाची व्यवस्था अशा नानाविध प्रकारे मदतीचे हे हात पुढे येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना मनापासून धन्यवाद दिले आहेत. कशी करायची मदत? कोरोना विषाणूविरुद्ध लढताना मदत करण्यासाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 हे स्वतंत्र खातं उघडण्यात आलं असून त्याचा बचतखाते क्रमांक 39239591720  आहे. वाच - ठणठणीत बऱ्या झालेल्या कोरोनारुग्णांचं रक्त करणार अत्यवस्थ रुग्णांवर उपचार खात्याची सविस्तर माहिती Chief Minister’s Relief Fund-COVID 19 Savings Bank Account number 39239591720 State Bank of India, Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023 Branch Code 00300 IFSC CODE- SBIN0000300 याचाच अर्थ तुम्ही तुमची मदत मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19, बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023 शाखा कोड 00300, आयएफएससी कोड SBIN0000300 यावर देऊ शकता. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकता किंवा धनादेशही देऊ शकता. या सगळ्या देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या  80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. सढळ हाताने मदत करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. अन्य बातम्या 6 महिन्यांच्या चिमुकल्यापासून 81 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत कोरोनाशी यशस्वी लढा IPS बायको कोरोनाशी लढतेय तर सध्या नवरा काय करतोय? SP पत्नीने शेअर केला VIDEO
    First published: