मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात क्वारंटाईन केलेले 17 पैकी 2 कर्मचारी पळाले

धक्कादायक! मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात क्वारंटाईन केलेले 17 पैकी 2 कर्मचारी पळाले

क्वारंटाईन करण्यात आलेले नागरिक पळून जाण्याच्याही घटना वाढल्या आहेत.

क्वारंटाईन करण्यात आलेले नागरिक पळून जाण्याच्याही घटना वाढल्या आहेत.

क्वारंटाईन करण्यात आलेले नागरिक पळून जाण्याच्याही घटना वाढल्या आहेत.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 5 एप्रिल: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आता झपाट्याने वाढ होत आहे. हा आकडा आता 661 वर पोहोचला आहे. त्या मुंबईत सर्वाधिक 377 रुग्ण आहेत. त्यात राज्यात रविवारी आणखी 26 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे, क्वारंटाईन करण्यात आलेले नागरिक पळून जाण्याच्याही घटना वाढल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलेले 17 पैकी 2 कर्मचारी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हेही वाचा.. 'तबलिगी' बनले भुकेल्यांसाठी देवदूत, गरजूंना केलं अन्न धान्याचे वाटप मुंबई महापालिकेच्या व्ही.एन.देसाई रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपूर्वी 17 कर्मचाऱ्यांनी क्वारंटाईन करण्यात आलं होतं. 17 पैकी 2 कर्मचारी पळून गेल्याची माहिती रविवारी समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात हे सर्व कर्मचारी आले होते. त्याच व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी रुग्णालयात मृत्यू झाला होता. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासन खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था करत नसल्याने कर्मचारी पळून गेल्याचा दावा इतर कर्मचाऱ्यांनी केला आहे. शनिवारी याच मुद्यावरून रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं. रुग्ण सातत्याने वाढत असतानाही क्वारंटाईन केलेले नागरिकांचं पळून जाणे ही चिंतेची बाब आहे. हेही वाचा..कोरोनाचं थैमान : देशात 24 तासात 472 नवे रूग्ण, 274 जिल्ह्यांना ग्रासलं डोंबिवलीच्या रुग्णालयातून क्वारंटाइन केलेला रुग्ण पळाला दुसरीकडे, मुंबईचं उपनगर असलेल्या डोंबिवलीमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. ही घटना ताजी असतानाच रुग्णालयातून क्वारंटाउन केलेला रुग्ण पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली आणि परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुंबईत नेण्यास विलंब होत होता. त्यामुळे शहरातील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, शनिवारी रात्री शास्त्रीनगर रुग्णालयातून एक क्वारंटाइन व्यक्ती पळून गेल्याची घटना समोर आली. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानं या व्यक्तीला क्वारंटाइन करण्यात आलं होतं. रुग्णालयातच या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. शनिवारी रात्रीही ही व्यक्ती रुग्णालयातून पळून गेल्यामुळे प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. असंही सांगितलं जात आहे की, रुग्णालयामध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याने आणि चांगली सोय नसल्याने ही व्यक्ती पळून गेली असावी अशी चर्चा आहे. या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहे. हेही वाचा...लेकींच्या खांद्यावरून बापाचा शेवटचा प्रवास, मुलींनी केले अंत्यसंस्कार महाराष्ट्रात आकडा वाढला महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित संख्या 690 झाली आहे. कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत रविवारी 29 नवे रुग्ण आढळले. पुणे 17, पिंपरी चिंचवड 04, अहमदनगर 03,औरंगाबाद 02 अशी 55 रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत 56 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या