Home /News /maharashtra /

मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचलेल्या राज ठाकरे यांनी दिली विचित्र प्रतिक्रिया

मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचलेल्या राज ठाकरे यांनी दिली विचित्र प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी 2 वाजता राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.

मुंबई, 7 मे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी 2 वाजता राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. राज्यात मोठ्या प्रमाणात संक्रमित झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांचे सहकार्य महत्वाचं असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र, यावेळी सर्व राजकीय नेत्यांनी मास्क घातलेला असताना राज ठाकरे मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचले होते. एवढंच नाही तर बैठकीला बसल्यानंतरही राज यांनी मास्क टेबलवरच ठेवला होता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं करण्यात आलं. 'मास्क का घातला नाही', असा राज यांना प्रश्न केला असता 'सगळ्यांनी घेतला म्हणून नाही घातला', असं विचित्र उत्तर त्यांनी दिलं आहे. बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधली. त्यावेळी राज यांनी अनेक मुद्यांना हात घातला. हेही वाचा...औरंगाबादेत धोका वाढला, कोरोनाचा 12 वा बळी, आणखी आढळले 17 नवे रुग्ण या बैठकीला राज्य सरकारकडून या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील सहभागी झाले. तसेच विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे , वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर, जयंत पाटील, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई आदी नेत्यांचाही या चर्चेत सहभाग झाले. हेही वाचा...पालघर साधू हत्यांकाडप्रकरण: तब्बल 20 दिवसानंतर समोर आली महत्त्वपूर्ण माहिती राज्यात कोरोनानं थैमान घातलं असताना कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक आहे. तसंच सार्वजनिक मास्क न वापरल्यास 1000 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. पण राज ठाकरे मास्क न लावताच मंत्रालयात आल्याने त्यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोरोनाबाबत करण्यात आलेले नियम आणि अटी फक्त सामान्यांसाठीच आहेत का? असा सवालही उपस्थित करणयात येत आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या