Home /News /maharashtra /

CORONA पोलिसांचा पिछा सोडेना ! 24 तासांत 221 कोरोनाबाधित, 1000 वर पोहोचला आकडा

CORONA पोलिसांचा पिछा सोडेना ! 24 तासांत 221 कोरोनाबाधित, 1000 वर पोहोचला आकडा

देशात कोरोना कोरोना महामारीचा सर्वाधित फटका महाराष्ट्राला बसला आहे.

    मुंबई, 11 मे: देशात कोरोना कोरोना महामारीचा सर्वाधित फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 22171 झाली आहे. धक्कादायक म्हणजे कंटेनमेंट झोनमध्ये कर्तव्य बजावणारे पोलिस कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेली माहिती अशी की, गेल्या 24 तासांत 221 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 18 अधिकारी तर 203 वेगवेगळ्या रँकच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात कोरोना संक्रमित पोलिसांची संख्या 1007 वर पोहोचला आहे. आतपर्यंत कोरोनामुळे सात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा... ड्युटीवर असलेल्या नर्ससोबत अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरनं केलं असं... देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत 22171 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर आतापर्यंत कोरोनाने 832 जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, 4199 नागरित कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. मुंबईत 13,564 संक्रमित... दुसरीकडे, देशाची आर्थिक राजधारी मुंबई संकटात सापडली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 875 नवे रुग्ण सापडले आहे. शहरात एकूण रुग्णांची संख्या 13,564 झाली आहे. तर आतापर्यत कोरोनामुळे 508 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मध्य मुंबईत असलेल्या आर्थर रोड जेलमध्ये 77 कैदी आणि 26 कर्मचारी कोरोनांना कोरोनाची लागण झाली. भायखळा महिला जेलमध्येही एका महिला कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. हेही वाचा..औरंगाबादमध्ये धोका वाढला! कोरोनाने घेतला 14 वा बळी तर रुग्णसंख्या 600 वर कोरोनामुळे कोणत्या राज्यात किती मृत्यू? महाराष्ट्र- 832 गुजरात- 493 मध्य प्रदेश- 215 राजस्थान-107 दिल्ली- 73 उत्तर प्रदेश-74 आंध्र प्रदेश-45 पश्चिम बंगाल- 185 तमिळनाडु-47 तेलंगाणा- 30 कर्नाटक-31 पंजाब-31 जम्मू-काश्मीर-9 हरियाणा-10 केरळ-4 झारखंड- 3 बिहार- 6 ओडिशा- 3 चंडीगड-2 हिमाचल प्रदेश-2 आसाम- 2 मेघालय- 1
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या