सॉरी सर...सॉरी सर.., गाडीवरुन खाली पडेपर्यंत बसले फटके,सोलापुरी पोलिसांचा झटका, पाहा हा VIDEO

सॉरी सर...सॉरी सर.., गाडीवरुन खाली पडेपर्यंत बसले फटके,सोलापुरी पोलिसांचा झटका, पाहा हा VIDEO

सोलापूर मार्केट झालेल्या गर्दीनंतर संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांचा प्रसाद मिळाल्याचे पाहायला मिळाला आहे.

  • Share this:

सोलापूर, 24 मार्च : एकीकडे कोरोनामुळे जगभरात आणीबाणीची परिस्थिती आलेली असताना दुसरीकडे तरुणांमध्ये याचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात संचारबंदी लागली असतानाही सोलापुरातही काही तरुण मंडळी अनावश्यक रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी आता चांगलीच कंबर कसली आहे.

सोलापूर मार्केट झालेल्या गर्दीनंतर संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांचा प्रसाद मिळाल्याचे पाहायला मिळाला आहे. सोलापूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.

संचारबंदी लागू केली असतानाही काही महाभाग हे रस्त्यावर बिंधास्तपणे फिरत होते. पोलिसांनी या महाभागांना चांगलाच चोप दिला. काही जणांनी तर पोलिसांना पाहून दुरूनच धूम ठोकली. तर काही जणांनी नको ते धाडस करून पुढे  जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी 'छडी लागे छम छम' म्हणत चांगलाच चोप दिला. अखेर काही जणांनी सॉरी सॉरी म्हणून धूम ठोकली.

महिला कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चोपले

दरम्यान, अहमदनगर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लावली आहे. मात्र, काहीजण कुठलेही काम नसताना फिरत आहेत. त्यांना रोखण्यासाठी पारनेरच्या तहसीलदार ज्योती पवार स्वतः रस्त्यावर उतरल्या आहे. कायदा मोडणाऱ्या नागरिकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 144 कलम लागू केले आहे. मात्र, नगरकरांनी कायदा मोडत भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. सरकार आपल्या परीने सर्व प्रयत्न करत असल्याने नागरिक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे असं चित्र नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले. यातच भाजीपाला विक्री त्यांनी आपल्या भाज्यांचे दर वाढले आहेत.

First published: March 24, 2020, 5:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या