Home /News /maharashtra /

PM मोदींचं एक भाषण आणि जयंत पाटलांनी सांगितले 5 दुष्परिणाम, म्हणाले...

PM मोदींचं एक भाषण आणि जयंत पाटलांनी सांगितले 5 दुष्परिणाम, म्हणाले...

पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात कोणत्याही बाबींची सविस्तर स्पष्टता दिलेली नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केलं आहे.

  मुंबई, 25 मार्च : कोरोना व्हायरसचा भारतातील वाढता प्रभाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करत याबाबत माहिती दिली. मात्र लॉकडाऊनवेळी काय-काय सुरू राहणार याबाबत पंतप्रधानांनी माहिती न दिल्याने लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याची टीका होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनीही याच मुद्द्यावरून मोदींवर टीका केली आहे. 'जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशात लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात कोणत्याही बाबींची सविस्तर स्पष्टता दिलेली नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केलं आहे. मोदींच्या भाषणाने काय परिणाम झाला? जयंत पाटील म्हणतात... 1. देशभर अत्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 2. लोक सैरभैर होऊन मोठ्या प्रमाणावर किराणा मालाच्या दुकानांकडे धाव घेऊन साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. 3. जीवनावश्यक गोष्टींबाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. 4. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वाच्य नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाली आहे. 5. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता. लॉकडाऊन जाहीर करताना काय म्हणाले नरेंद्र मोदी? पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाषणात 21 दिवस देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. देशात कोरोनाचा (Coronavirus) विळखा वाढू नये यासाठी हे लॉकडाऊन आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही मोदींनी जनता कर्फ्यूचं (Janata Curfew) आवाहन केलं होतं. मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - - तुमचं घराबाहेर पडणं हे मृत्यूला आमंत्रित करणारं ठरेल. जगभरात हेच दिसून आलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर निघू नका. - पुढील 21 दिवस देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे - लॉकडाऊन दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये. - ज्या देशांनी योग्य उपाय योजले त्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे. - 22 मार्चला देशवासियांनी जनता कर्फ्यूमध्ये आपलं योगदान दिलं. संकटाच्या या काळात सर्व एकत्र आले आणि जगाला दाखवून दिलं. - जगातील शक्तिशाली देशांनाही कोरोनाने गुडघे टेकायला लावलं आहे. या देशांजवळ सर्व साधनं असतानांही कोरोना वेगाने पसरत आहे. - कोरोनाशी (Covid - 19) लढायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंगशिवाय कुठलाही पर्याय नाही असं जगातले तज्ज्ञ सांगत आहेत. घरातच राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही. - तुमची एक चूक तुमच्या कुटुंबाला आणि देशालाही अडचणीत टाकू शकते. -असंच दुर्लक्ष होत राहिलं तर भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागले. त्याचा अंदाज करणंही शक्य नाही. - केंद्र सरकारने 15000 कोटी रुपये कोरोना व्हायरसच्या संकटासाठी दिले आहेत. मेडिकल आणि पॅरामेडिकल ट्रेनिंगच काम करावं लागेल. - केंद्र सरकार राज्य सरकारांबरोबर गरीबांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सगळे प्रयत्न आपण करीत आहोत. पण आयुष्य वाचवण्यासाठी जे आवश्यक आहे, त्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायलाच हवी. - तुमच्या आरोग्याची काळजी घेत, स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टर, मेडिकल सेवा देणारे कर्मचारी, मीडिया, पोलीस यांचा विचार करा.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Coronavirus, Jayant patil, Narendra modi

  पुढील बातम्या