डोंबिवलीकरांनो, सावध व्हा! कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू

डोंबिवलीकरांनो, सावध व्हा! कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू

कल्‍याण डोंबिवली पालिका क्षेत्रात 4 नवे रूग्‍ण आढळून आले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्‍णसंख्‍या आतापर्यंत 28 झाली आहे.

  • Share this:

डोंबिवली, 05 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आज दुपारपर्यंत 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यानंतर डोंबिवलीमध्येही एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे.

डोंबिवली पूर्व भागात राहणाऱ्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबद्दल रामनगर पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या तिच्या कुटुंबीयातील काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या 28 वर

कल्‍याण डोंबिवली पालिका क्षेत्रात 4 नवे रूग्‍ण आढळून आले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्‍णसंख्‍या आतापर्यंत 28 (निळजे प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील 01 रूग्‍ण धरून) झाली आहे. नवीन रूग्‍णांपैकी 01 महिला रूग्‍ण(54 वर्ष) डोंबिवली पूर्व भागातील आहे. या महिलेला तापाची लक्षणे जाणवल्यामुळे ती खाजगी रुग्णालयात भरती झाली होती.

हेही वाचा -मुख्यमंत्रिपदाचा धोका टळला, उद्धव ठाकरे असे होणार आमदार?

इतर 2 महिला रुग्णांपैकी( वय अनुक्रमे 75 आणि 7 वर्ष ) या देखील डोंबिवली पूर्व भागातील असून त्या कोरोनाबाधित रुग्‍णाच्या निकट संपर्कात आल्या होत्या. चौथी महिला रुग्ण डोंबिवली पश्चिम येथीलअसून ( वय 24 वर्ष) सदर महिला पॅरिस इथून परत आली होती. सदर चारही कोरोनाबाधित रुग्ण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.

डोंबिवलीच्या रुग्णालयातून क्वारंटाइन केलेला रुग्ण पळाला

दरम्यान, डोंबिवली शहरातील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.  परंतु, शनिवारी रात्री शास्त्रीनगर रुग्णालयातून एक क्वारंटाइन व्यक्ती पळून गेल्याची घटना समोर आली. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानं या व्यक्तीला क्वारंटाइन करण्यात आलं होतं. रुग्णालयातच या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. परंतु, शनिवारी रात्रीही ही व्यक्ती रुग्णालयातून पळून गेल्यामुळे प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा - उस्मानाबादमध्ये कोरोनाचा तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण, राज्यातील आकडा 635 वर

असंही सांगितलं जात आहे की, रुग्णालयामध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याने आणि चांगली सोय नसल्याने ही व्यक्ती पळून गेली असावी अशी चर्चा आहे.  या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहे.

पुण्यात 2 जणांचा मृत्यू

दरम्यान, गेल्या 24 तासांत पुण्यातील दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक 60 वर्षींची ज्येष्ठ महिला आहे तर दुसरा 48 वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. या दोघांवरही ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट रात्री उशिरा आला होता. या रिपोर्टमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट लिहिलं होतं.

या कोरोनाग्रस्त 60 वर्षीय महिलेला काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यानं उपचारासाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. या महिलेला पुन्हा काल अस्वस्थ वाटू लागल्यानं नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा रिपोर्ट उशिरा आला त्यावेळी तिला करोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

First published: April 5, 2020, 12:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या