Home /News /maharashtra /

भयंकर! पायी जाणाऱ्या बापलेकावर रानडुक्करांचा हल्ला, मुलाला वाचवलं पण...

भयंकर! पायी जाणाऱ्या बापलेकावर रानडुक्करांचा हल्ला, मुलाला वाचवलं पण...

बापलेकांवर हल्ला केला तेव्हा राजू यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी एका हाताने डुक्करांवर काठीने प्रहार करून जायबंद केलं

     इम्तियाज अली, प्रतिनिधी यावल, 30 मार्च : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकीकडे सरकार घरी थांबण्याचे आवाहन करत आहे. परंतु,  तरीही लोकं संचारबंदी तोडून घराबाहेर पडत आहे. जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये  पायी चालत जाणाऱ्या पिता आणि पुत्रावर रानडुक्करांनी हल्ला केल्याचा घटना घडली. यात एक जण ठार झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंबापाणी गावा जवळील जंगल परिसरात ही घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील अनेक आदिवासी बाजार करण्यासाठी जंगल परिसरातून जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात येत असतात अशाच प्रकारे साबसिंग बारेला आणि राजू सिंग बारेला हे पिता पुत्र यावलकडे पायी येत होते. हेही वाचा - मोबाईल व्हायब्रेट झाला तर समजा जवळ कोरोनाचा रुग्ण, अ‍ॅप डाउनलोड करणे पडले महागात यावल तालुक्यातील अंबापाणी जंगल परिसरातून यावल येथे येत असताना आज दुपारच्या सुमारास अचानकपणे बाप लेकांवर रानडुक्करांनी हल्ला चढवला आहे. अचानकपणे हल्ला झाल्याने बेसावध असलेल्या राजू बारेला हे जमिनीवर कोसळले. खाली कोसळल्यानंतरही रान डुक्करांनी त्याच्यावर हल्ला सुरूच ठेवला. डुक्कारांनी केलेल्या भीषण हल्ल्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हेही वाचा -Fact check - भरपूर पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो? रान डुक्करांनी जेव्हा या बापलेकांवर हल्ला केला तेव्हा राजू यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी एका हाताने डुक्करांवर काठीने प्रहार करून जायबंद केलं होतं. पण, तरीही यात त्यांचा मुलगा साबसिंग गंभीर जखमी झाला. साबसिंगने कसाबसा जीव वाचवून तिथून पळ काढला. त्याला  यावल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या