Home /News /maharashtra /

तलफ भागवण्यासाठी टपरी फोडली, पण मालकाच्या हुशारीमुळे संतापले चोरटे, पाहा हा VIDEO

तलफ भागवण्यासाठी टपरी फोडली, पण मालकाच्या हुशारीमुळे संतापले चोरटे, पाहा हा VIDEO

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे माहुली शिवारात असलेल्या पान टपरीला चोरट्यांनी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे.

संगमनेर, 28 मार्च : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. जीवानवश्यक वस्तू वगळता सर्वच दुकानं बंद आहे. त्यामुळे व्यसनाधीन महाभागांचे चांगलेच हाल झाले आहे. संगमनेरमध्ये तर चोरट्यांनी पानटपरी फोडली पण हाती काही लागले नाही. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे माहुली शिवारात असलेल्या पान टपरीला चोरट्यांनी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. भक्कम बनावटीची टपरी फोडताना चोरांची मोठी दमछाक झाली. एवढं करुनही हाती काहीच न लागल्याने चोरट्यांनी संतापाच्या भरात टपरीच पेटवून दिली. सध्या लॉकडाउन असल्याने टपरीचालक भारत गाडेकर यांनी टपरीतील सर्व माल अगोदरच घरी नेला होता. सर्व काही बंद असल्यामुळे चोरट्याने पान टपरी फोडण्याचा डाव आखला. पण, टपरीत काहीच नव्हतं. त्यात भक्कम लोखंडी असलेली टपरी फोडताना चोरांच्या नाकीनऊ आले. त्यामुळे चोरांचा हिरमोड झाल्याने त्यांनी हे कृत्य केलं आहे. हेही वाचा -'कोरोनाची चाचणी करून घे', संतापलेल्या पत्नीने नवरा आणि सासूला विळ्याने केली मारहाण परंतु, अगोदर दोनदा चोरीच्या घटना घडल्यानंतर टपरीचालकाने 50 हजार रुपये खर्च करून अद्यावत फर्निचर बनवले होते. ते या आगीत पूर्णपणे  जळून खाक झालं आहे. चोरींच्या घटना कमी झाल्या असल्या तरी लॉकडाउनमुळे असेही साईड इफेक्ट समोर येत आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या