डॉक्टरांचं जग करतंय, कौतुक! पण, चंद्रपूरमध्ये घडलं भयंकर, पाहा हा VIDEO

डॉक्टरांचं जग करतंय, कौतुक! पण, चंद्रपूरमध्ये घडलं भयंकर, पाहा हा VIDEO

एका मद्यपी रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूने नातेवाईक संतप्त झाल्यानंतर ही घटना घडली.

  • Share this:

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 01 एप्रिल :कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. कोरोनामुळे  हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देश ठप्प झाले आहे. परंतु, अशाही परिस्थितीत डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावून आपलं कर्तृत्व बजावत आहे. महाराष्ट्रातील शासकीय डॉक्टरही अहोरात्र कोरोना रुग्णांचा सेवेत आहे. परंतु, चंद्रपूरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे.

चंद्रपूर शहरातील ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कुबेर कोतपल्लीवार यांच्या साई डिव्हाईन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात तोडफोड झाल्याने खळबळ उडाली आहे. एका मद्यपी रुग्णाचा  उपचारादरम्यान मृत्यूने नातेवाईक संतप्त झाल्यानंतर ही घटना घडली.

राकेश यादव (वय 36) असं कोळसा खाण कर्मचारी असलेल्या मृतकाचे नाव आहे. 29 मार्च रोजी रात्री राकेशचं  दारूमुळे लिव्हर काम करत नसल्याने साई डिव्हाईन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ICU मध्ये रुग्णाची देखभाल करताना निष्काळजीपणा दाखवला गेल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. तसंच, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच राकेशचा मृत्यू झाल्याचा  आरोप करत कुटुंबीयांनी रुग्णालयाची तोडफोड केली. यावेळी  महागड्या साहित्यांचीही नासधूसही करण्यात आली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हेही वाचा  -बापरे! Coronavirus ने लहान मुलांनाही बनवलं आपलं शिकार, 2 रुग्णांचा मृत्यू

या प्रकारबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करत आहे. घडलेल्या या घटनेबद्दल शहरातील डॉक्टर मंडळींनी  निषेध केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2020 02:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading