बुलडाणा, 01 एप्रिल : महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बुलडाण्यात कोरोनाबाधित शिक्षकाचा मृत्यू झाला होता. आता मात्र, या शिक्षकाच्या संपर्कात असलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी 29 मार्च रोजी बुलडाण्यातील एका 45 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. या मृतक कोरोनाग्रस्त शिक्षकाच्या संपर्कात आलेला 23 वर्षीय तरूण पॉझिटिव्ह आढळला आहे. आणखी 8 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे मृत व्यक्तीसह कोरोनाग्रस्तांची संख्या 4 वर पोहोचली आहे.
मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यविधीमध्ये 100 ते 150 नागरिक उपस्थित
मृत कोरोना रुग्ण हा न्यूमोनिया झाला म्हणून भरती झाला होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच प्रशासनाने रुग्णाचे नातेवाईकांची तपासणीसाठी त्यांचे घर गाठले. त्यानंतर सर्वाना क्वारंटाइन करण्यात आले. तसंच या रुग्णाच्या जे कोणी संपर्कात आले त्यांचाही शोध घेतला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे सोमवारी या रुग्णाच्या अंत्यविधीमध्ये 100 ते 150 च्या जवळपास नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा -मुंबईमध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू, राज्यात मृतांचा आकडा 12वर
या रुग्णाने कोणत्याही परदेशात दौरा केला नव्हता. तरीही पॉझिटिव्ह कसा निघाला याचा शोध प्रशासन घेत आहे. तसंच ज्या भागात तो राहत होता. ते ठिकाणी सुद्धा सील करण्याचा निर्णय घेणार आहेत. शिवाय ज्या रुग्णालयत अगोदर भरती होता. त्या रुग्णालयाच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल आणि त्यांना आयसोलेट करण्यात आहेत.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची 320 वर
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज वाढ झाली आहे. मुंबईतून 16 तर पुण्यातून कोरोनाचे 2 नवे रुग्ण समोर आले आहेत. राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची 320 वर पोहोचली आहे. एकीकडे मुंबईकरांची चिंता वाढल्याचं समोर आलं आहे. कारण अवघ्या 12 तासांमध्ये मुंबईमध्ये 16 नवे रुग्ण समोर आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.