लॉकडाउनमध्ये मटणाचे भाव ऐकाल, तर खाणे सोडून द्याल, पण...

लॉकडाउनमध्ये मटणाचे भाव ऐकाल, तर खाणे सोडून द्याल, पण...

मागील आठवड्यातच राज्य सरकारने मटण, मासे आणि अंडी विकण्यावर निर्बंध हटवले आहे.

  • Share this:

ठाणे, 01 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यवहार बंद आहे. अशाही परिस्थितीत काही महाभाग हे चढ्या भावाने वस्तू विकत असल्याचं समोर आलं आहे.

मागील आठवड्यातच राज्य सरकारने मटण, मासे आणि अंडी विकण्यावर निर्बंध हटवले आहे. निर्बंध हटवल्यानंतर ठिकठिकाणी पुन्हा एकदा मासे आणि मटण विक्रीस सुरुवात झाली आहे. परंतु, ठाण्यात लॉकडाउनचा फायदा घेत तब्बल 900 ते 1 हजार रुपये प्रती किलो या चढ्या भावाने मटण विक्री करत असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा - अखेर कोरोनाला मारण्याचा उपाय सापडला! WHO करणार शेवटची तपासणी

हा प्रकार ठाण्यातील कोपरी येथे घडला. कोपरी येथील तुळजा भवानी मटण शॉपवर आज सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत मटण शॉप विक्रेत्यांने मटण 900 ते 1 हजार रुपये किलोने विक्री करायला सुरुवात केली. यावर काही ग्राहकांनी आवाज उठवत पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी येवून मटन विक्रेत्यावर कारवाई केली.

हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये बेवड्यांचा कहर, थेट केला माजी मंत्र्यांना मेसेज आणि...

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मटण विक्रेत्यांवर कारवाई करायला सुरुवात करताच विक्रेत्याने पोलिसांच्या हातापाया पडत 600 ते 700 रुपये प्रती किलो मटण विक्री करण्यास कबूल केलं.

तसंच कोपरी येथे पोलिसांनी जाहीर सुचना करत सर्व प्रकारच्या दुकानदारांना आणि विक्रेत्यांना चढ्या भावाने वस्तू न विकण्याची सक्त ताकीद दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2020 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading