Home /News /maharashtra /

'पोरांना बघायला कोणी नाही, घरी जाऊ द्या ओ..'

'पोरांना बघायला कोणी नाही, घरी जाऊ द्या ओ..'

पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यातील 10 कुटुंब पुण्यात बांधकामांवर मजूर म्हणून काम करत होते.

पंढरपूर, 31 मार्च :  पुण्यातून  कर्नाटककडे पायी चाललेल्या 47 जणांना पंढरपुरातील विलगीकरण विभागात ठेवण्यात आलं आहे. यामध्ये अनेक मातांचा समावेश आहे. 'आम्हाला जेवण नको, आमची मुलं उपाशी आहेत, त्यांना बघण्यासाठी कोणी नाही.आम्हाला घरी जाऊ द्या' अशी आर्त हाक अडकलेल्या मातांनी धाय मोकलून रडत पोलीस अन् प्रशासनाकडे केली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यातील 10 कुटुंब पुण्यात बांधकामांवर मजूर म्हणून काम करत होते. कोरोनाचा पार्दुभाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे ही कुटुंब उघड्यावर पडली. तीन दिवस पुणे ते पंढरपूर पायी प्रवास करून शहरात दाखल झाली आहे. हेही वाचा -कोरोनाबाधितांसाठी स्टेडियम वापरण्याचा पर्याय, असा होईल वापर! 47 कामगारांना पोलिसांनी क्वारंटाइन केलं असून 65 एकर मधील भक्तनिवासामधील विलगीकरण विभागात ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांची तपासणी करून पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.  त्यांची जेवणाची सोयही करण्यात आली असली तरी कुटुंबातील सदस्य दिसत नसल्यानं हवालदिल झाले आहेत. 'आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या, आमच्या घरातील लेकराबाळात वयोवृद्धात जाऊन राहू द्या' अशी याचना करत आहेत. हेही वाचा -पाकमध्ये ATMमधून चोरलं सॅनिटायझर, अजब चोरीचा CCTV VIDEO व्हायरल दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. तसंच प्रत्येक राज्यांनी आपल्या सीमा सील केल्या आहे. परंतु, दुसरीकडे इतर राज्यातून आलेले कामगार आणि मजुरांनी आपल्या गावाकडे वाट धरली आहे. महाराष्ट्राच्या गुजरात, मध्यप्रदेश सीमेलगत असे अनेक मजूर आपल्या कुटुंबासह अडकून पडले आहे. या सर्व मजुरांना जिथे आहे तिथेच राहण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तसंच, या सर्व मजुरांची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्थाही सरकारकडून करण्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या