धक्कादायक, 'निझामुद्दीन रिटर्न'मधील 24 जण नगरमध्ये आढळले!

धक्कादायक, 'निझामुद्दीन रिटर्न'मधील 24 जण नगरमध्ये आढळले!

दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित तब्लिगी जमात परिषदेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 136 प्रवासी गेले होते.

  • Share this:

अहमदनगर, 1 एप्रिल :  दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित तब्लिगी जमात परिषदेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 136 प्रवासी गेले होते. त्यातील 24 जण हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचं समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दिल्लीतील निझामुद्दीन इथून 136 जण हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली. त्यातच दिल्लीवरून परत आलेले  24 जण हे नगरमधील असल्याचे समोर आलं आहे. त्यातील 10 जणांना मंगळवारी  नगर प्रशासनाने नेवासा येथून शासकीय रुग्णालयात आणलं.  तर उर्वरीत 14 जणांची आधीच ओळख पटवली होती. या 14 जणांनी जामखेडमध्ये 144 चे उल्लंघन करत नमाज घेतली म्हणून कारवाई केली होती. त्यांची कसून चौकशी केली असता दिल्लीच्या प्रवासाची माहिती समोर आली.

हेही वाचा -दहशतवादी हल्ल्यापेक्षा कोरोना घातक, अमेरिकेत 9/11पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

त्यामुळे प्रशासनाने या 14 जणांची वैद्यकीय तपासणी केली असता 14 पैकी 2 जण निगेटिव्ह आढळले आहे. तर संपर्कात आलेल्या 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

यामुळे धोका अधिकच वाढला आहे. हे 14 जण दिल्लीवरून मुंबईला आले होते. तेथून ते चेन्नई ते अहमदनगर असा प्रवास केला. नगरमध्ये आल्यानंतर संगमनेर, राहुरी, जामखेड आणि पुन्हा नगर असा प्रवास केला होता.

पुण्यातील 30 जण हॉस्पिटलमध्ये विलगीकरण वार्डात    

तर दुसरीकडे निझामुद्दीन रिटर्नपैकी 36 जण हे पुणे जिल्ह्यातले असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या 40 पथकांकडून त्यांचा शोध घेण्यात आला आहे. निझामुद्दीन येथून परतलेल्या 136 पैकी 36 जण पुण्यातील आहेत. 36 पैकी 30 जण पुणे शहराच्या विविध भागात राहतात तर 3 जण पिंपरी आणि 3 जण हे पुणे ग्रामीण भागात राहतात. आज या 30 जणांना हॉस्पिटलमधील विलगीकरण वार्डात ठेवण्यात आलं आहे. तसंच इतरांचा शोध सुरू आहे.

लोकांनी समोर येऊन माहिती द्यावी - गृहमंत्री

दिल्लीतील निझामुद्दीन रिटर्न बाबात केंद्रीय गृह विभाग आणि राज्यातील गृह विभाग यांच्यात संवाद सुरू आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यूज 18 लोकमत दिली.

हेही वाचा - मुंबईत अवघ्या 12 तासांमध्ये आढळले 16 नवे रुग्ण, राज्यात रुग्णांचा आकडा 320 वर

'दिल्लीत शंभरापेक्षा जास्त लोकं हे निझामुद्दीनच्या कार्यक्रमाला राज्यात सहभागी झाले होते. त्यातील काहीजण संपर्कात आले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं आहं. त्यांना कोरोनाबाधित झाले का? याची चाचणी करण्यात येणार आहे.  राज्यातील गृह मंत्रालय हे केंद्रीय गृहमंत्रालय संपर्कात असून केंद्र सरकारच्या समन्वयाने सर्व माहिती घेऊन संबंधित कार्यक्रम उपस्थित लोकांशी संपर्क करत आहोत, जे लोकं या कार्यक्रम सहभागी होते. त्यांनी स्वत: पुढे येऊन सांगणे गरजेचे आहे. त्या काही लोकांमुळे इतर लोकांना विनाकरण त्रास नको', असंही देशमुख यांनी सांगितलं.

First published: April 1, 2020, 9:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading