बारामतीत कोरोनाबाधित रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांबद्दल दिलासादायक बातमी!

बारामतीत कोरोनाबाधित रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांबद्दल दिलासादायक बातमी!

कोरोनाबाधित रुग्ण हा किती जणांच्या संपर्कात आला अशा बारामतीतील जवळपास 30 जणांना प्रशासनाने तपासणीनंतर होम क्वारंटाइन केलंय

  • Share this:

बारामती, 31 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. बारामतीमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती.  शहरातली रिक्षाचालकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे  त्यांच्या कुटुंबीतील नातेवाईकांची कोरोनाची  तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

बारामतीत शहरातील श्रीराम नगरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी बारामतीला भेट देऊन शहराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या भागातील रिक्षाचालकाला कोरोनाची लागण झाली आहे,  त्याची पत्नी, मुलं तसंच मेव्हणा या नातेवाईकांची तपासणी करण्यासाठी त्यांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यांचे रिपोर्टस आज आले.

हेही वाचा -नागपूरमध्ये कडकडीत लॉकडाउन अन् चोरांनी फोडले बिअरबार, पाहा हा VIDEO

सर्वाचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने बारामतीकरांनी थोडा धीर आला आहे.  या रिक्षाचालकामुळे बारामती शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  या सर्वांचा रिपोर्ट जरी निगेटिव्ह आले असले तरी हा परिसर पोलिसांनी सील केला आहे.

पाच डॉक्टरांचे हॉस्पिटल बंद 

रिक्षाचालक कोरोनाग्रस्त रुग्ण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बारामती शहरातील  काही डॉक्टरांच्या संपर्कात आलेला असल्याने बारामतीतील पाच डॉक्टरांनाही नाईलाजाने होम क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. शहरात  डॉक्टरांना आपली हॉस्पिटल  बंद ठेवावी लागत असून डॉक्टरच होम क्वारंटाइन असल्यानं आता हळुहळू वैद्यकीय सेवेवरही याचा परिणाम होणार आहे.

हेही वाचा -दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा, दररोज 25 रुपयांच्या दराने होणार खरेदी

3 किलोमीटरचा परिसर सील

बारामती नगर परिषदेच्या वतीने ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडला, त्या परिसरातील  तीन किलोमीटर वर  प्रत्येक कुटुंबात जाऊन त्यांची तपासणी आणि वैद्यकीय इतिहास जाणून घेतला जात आहे. या करीता 110 कर्मचारी या भागाचा सर्वे करीत आहेत. कोरोना संदर्भात इतर कोणाला अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ  या रुग्णास  तातडीने पुण्यात  तपासणीसाठी नेहले जाणार आहे.

जवळपास 30 जण होम क्वारंटाइन

हेही वाचा  -विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाला सलाम, साठवलेले 11 हजार दिले पंतप्रधान मदत निधीला

कोरोनाबाधित रुग्ण हा किती जणांच्या संपर्कात आला अशा बारामतीतील जवळपास 30 जणांना प्रशासनाने तपासणीनंतर होम क्वारंटाइन केलंय. अजूनही तो किती जणांच्या संपर्कात आला होता,याचा शोध सुरू आहे. जे नागरिक संबंधित रुग्णाच्या संपर्कात आले असतील, त्यांनी तपासणी करुन घ्यावी .व स्वताःला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्याची गरज असल्याचे प्रांत अधिकारी दादासो कांबळे यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2020 04:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading