तुकाराम मुंढेंच्या आवाहनाला नागपूरकरांनी दुसऱ्या दिवशीही दाखवली केराची टोपली

तुकाराम मुंढेंच्या आवाहनाला नागपूरकरांनी दुसऱ्या दिवशीही दाखवली केराची टोपली

मनपातर्फे 10 झोनमध्ये 24 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आहे

  • Share this:

नागपूर, 2 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये, एकत्र जमू नये, असं आवाहन वारंवार केलं जात आहे. परंतु, असं सांगून सुद्धा लोकं ऐकायला तयार नाही. नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या आवाहनालाही दुसऱ्या दिवशी केराची टोपली दाखवण्यात आली.

राज्यभरात संचारबंदी लागू असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू, भाजी, फळं विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. सकाळी संचारबंदी शिथील असल्यामुळे सर्वच ठिकाणी लोकं भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहे. काही ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवून Social Distancing चे नियम पाळले जात आहे.

हेही वाचा - धारावीतील 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू, मुंबईत आज 6 जणं दगावले

मात्र, नागपूरमध्ये  रेशीमबाग मैदानावर ठोक भाजी बाजारात Social Distancing चा आजही फज्जा उडाला आहे. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लोकांना केलेल्या आवाहनानंतर दुसऱ्या दिवशीही तुफान गर्दी पाहण्यास मिळाली.

एवढंच नाहीतर कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, कित्येक व्यक्तींनी मास्क न लावताच गर्दी केली होती.

हेही वाचा -कोरोनाचा सर्वात भीतीदायक VIDEO, तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर तुफान दगडफेक

ठोक भाजीपाला विक्रेत्यांना कालपासून महानगरपालिकेतर्फे  जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.  मनपातर्फे शहरातील  10 झोनमध्ये 24 ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आहे. पण, तरीही लोकं नियमांचं पालन करत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2020 09:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading