Home /News /maharashtra /

जे पिकवलं ते बाजारात कसं जाणार? शेतकऱ्याचं तब्बल 12 लाखांचं नुकसान

जे पिकवलं ते बाजारात कसं जाणार? शेतकऱ्याचं तब्बल 12 लाखांचं नुकसान

2 हेक्टर जमीन असलेल्यांना याचा फायदा होईल. यासाठी 75 हजार कोटी रुपये दरवर्षी सरकार भरणार.

2 हेक्टर जमीन असलेल्यांना याचा फायदा होईल. यासाठी 75 हजार कोटी रुपये दरवर्षी सरकार भरणार.

लॉकडाउन झाल्यामुळे संपूर्ण देशाचा व्यवहार ठप्प झाला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.

करमाळा, 28 मार्च :  कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. लॉकडाउन झाल्यामुळे संपूर्ण देशाचा व्यवहार ठप्प झाला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील शहाजी दगडू माने या शेतकऱ्याचे कलिंगड पिक मार्केटला न गेल्यामुळे या शेतकऱ्याचे 12 लाख रुपयांचे नुकसान झाले असून या पिकांचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. हेही वाचा - कोरोना झाला नसतानाही आजीने केली आत्महत्या, पोलीस तपासात समोर आली व्हायरसची दहशत करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील शहाजी दगडू माने या शेतकऱ्याने 4 एकर शेतात शुगर किंग या जातीच्या कलिंगड पिकाची लागवड केली होती. यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च करण्यात आला होता. यापासून साधारण 12 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित अपेक्षित होतं. हेही वाचा -असा दिसतो भारतात थैमान घालणारा ‘कोरोना’, पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो हे पीक घेण्यासाठी त्यांनी लोकांकडून हातऊसने पैसे घेतले असून ते त्यांना परत कसे करायचे हा प्रश्न या शेतकऱ्यासमोर पडला आहे. माझ्यासारखे महाराष्ट्रात अनेक शेतकरी आहेत. त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामेकरून एकरी दीड ते दोन लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. दरम्यान, दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी फळविक्री आणि पुरवठा करण्याबाबत मोठी घोषणा केली होती. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, अशी महत्त्वाची माहितीही पवार यांनी दिली. तसंच दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. शहराला फळभाज्या, फळं जे ट्रक वाहतूक करणार आहे. आधीच परवाने देण्यात येत आहे. तसंच या वाहनांना पेट्रोल-डिझेल पुरवठा करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या