Home /News /maharashtra /

'त्या' पत्रावरून जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

'त्या' पत्रावरून जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

'शरद पवार यांचे नाव न घेतल्याशिवाय भाजप नेत्यांचे दुकानंच चालत नाही. मुळात या प्रकरणाशी शरद पवारांचा कोणताही संबंधच येत नाही.

सोलापूर, 10 एप्रिल :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही संचारबंदी लागू करून सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. परंतु, अशाही परिस्थितीत यस बँक प्रकरणातील आरोपी महाबळेश्वरला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणावर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 'राज्यावर कोरोनासारखे संकट असताना केंद्राकडून काल गुरुवारी एक पत्रक आले आहे. या पत्रकानुसार पीपी कीट घ्यायचे नाही, मास्क घ्यायचे नाही, वैद्यकीय कुठलेही साहित्य असेल ते केंद्राच्या परवानगीशिवाय घ्यायचे नाही, असे निर्बंध घालण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना ही कीट अत्यंत गरजेची आहे, पण केंद्र सरकारच्या मनात महाराष्ट्रबद्दल काही किंतू आहे का?' असा सवाल करत आव्हाड यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हेही वाचा - कोरोनच थैमान सुरू असताना देशातील 40 जिल्ह्यांमधून Good News! तसंच, आम्हाला या प्रकरणावर राजकारण करायचं नाही आहे. परंतु, भाजपकडून नको त्या गोष्टीचं राजकारण केलं जात आहे. मग, या पत्रकावर भाजप पत्रकार परिषद घेऊन हे पत्रक मागे घेण्याची मागणी करेल का, असं म्हणत आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसंच, DHFL चे प्रमोटर्स आणि YES BANK घोटाळ्यात आरोप असलेले कपील आणि धीरज वाधवान बंधू यांच्यासह कुटुंबीयांना लॉकडाऊनदरम्यान महाबळेश्वरपर्यंत प्रवास केल्याची बाबसमोर आली. या प्रकरणावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी या प्रकरणामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाचा समाचार घेत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर एकच हल्लाबोल केला. हेही वाचा -मोठी बातमी, लॉकडाउन किती वाढणार? उद्धव ठाकरे मांडणार मोदींकडे 'हा' प्रस्ताव 'शरद पवार यांचे नाव न घेतल्याशिवाय भाजप नेत्यांचे दुकानंच चालत नाही. मुळात या प्रकरणाशी शरद पवारांचा कोणताही संबंधच येत नाही. तरीही भाजप नेत्यांकडून पवारांचं नाव पुढे केलं जात आहे. या प्रकरणात गृह विभाग विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे, एवढा निर्णय त्यांच्याही काळात कधी कुणी घेतला नाही, असा टोलाही आव्हाडांनी लगावला. गृह विभागाच्या प्रधान सचिवांवर कारवाई दरम्यान, कपील आणि धीरज वाधवान बंधू यांच्यासह कुटुंबियांना लॉकडाऊनदरम्यान प्रवासाचे VIP पास देणं चांगलच भोवलं आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत गृह विभाग विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्रालय आणि सरकारकडून याची तातडीनं चौकशी करून योग्य ती कारवाई कऱण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. काय आहे प्रकरण? कपील आणि धीरज वाधवान बंधू यांनी लॉकडाऊनची उल्लंघन केल्याचं उघड झालं आहे. 144 कलमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. हे वाधवान बंधू आपल्या 5 अलिशान कार्स मधून 23 कुटुंबीयांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वरला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही गेले होते. या प्रवासासाठी त्यांनी थेट गृहमंत्रालयातून पत्र मिळालं होतं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या