डोंबिवली, 02 एप्रिल : महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सरकारने सूचना करून काही ठिकाणी खबरदारी न घेण्याचे प्रकार पाहण्यास मिळत आहे. डोंबिवलीमध्येही असाच प्रकार पाहण्यास मिळाला. त्यामुळे एका व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
डोंबिवलीमध्ये परदेशातून आलेल्या तरुणाला होम क्वारंटाइन राहण्याची सूचना केल्यानंतरही एका लग्न सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यानंतर या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची स्पष्ट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.
हेही वाचा - 24 तासात तब्बल 328 जणांना कोरोनाची लागण, देशात मृतांचा आकडा वाढताच
ज्या लग्नामुळे डोंबिवलीमध्ये 6 ते 8 परिसर पुर्णत: सील केलेत आणि जवळपास 60 ते 70 जणांना होम क्वारंटाइन केलं गेलं आहे. मात्र, या रुग्णाला पालिकेनं कस्तुरबा हॉस्पिटलला जायची व्यवस्था केली नाही. कोरोनाची लागण झाली असूनही त्याला चक्क खाजगी वाहनातून कस्तुरबाला पाठवण्यात आले होते.
धक्कादायक म्हणजे, या कोरोनाबाधित रुग्णासोबत त्याचे कुटुंब देखील चाचणी करण्यासाठी कस्तूबा रुग्णालयात गेले होते. पण चाचणी न करताच त्यांना घरी परत पाठवण्यात आले होते. ज्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांना असं सोडणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा सगळा प्रकार कोरोनाबाधित डोंबिवलीकरांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने समोर आला.
हेही वाचा -एकेकाळी टोलिफोन बुथवर काम करणारा हा मुलगा आज आहे कॉमेडिचा किंग!
मात्र “या कोरोनाबाधित रुग्णासाठी आम्ही रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली होती. तरीही ही बाधित व्यक्ती रुग्णवाहिकेनं न जाता खाजगी वाहनाने कस्तुरबाला गेली. तसंच, या रुग्णाच्या आई-वडिलांची टेस्ट करण्याची चिठ्ठी देखील आम्ही दिली होती. त्यांची चाचणी का झाली नाही याची आम्ही चौकशी करतोय” अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतर्फे देण्यात आली.
10 ते 12 लाख लोकसंख्या असलेल्या कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत जात आहे. मात्र, प्रोटेकट कीट नसलेल्या आणि व्हेंटिलेटर नसलेल्या फक्त 4 रुग्णवाहिका केडीएमसीकडे आहेत तर फक्त 6 डाॅक्टर आणि 22 नर्सेस कोरोना टीममध्ये असून कल्याण डोंबिवली करता एकच आहे.
डोंबिवली येथील शास्त्रीनगर हॉस्पिटल आयसोलेशन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पण या हॉस्पिटलची दुरावस्था म्हणजे तिथे पेशंट बरा व्हायच्या ऐवजी आणखी आजारी पडून त्याचा मृत्यू होईल.
हेही वाचा -VIDEO : PM काकांनी काय सांगितलं? घराबाहेर पडणाऱ्या बाबांना चिमुरडीने दिला दम
केडीएमसीचे सर्व अधिकारी कर्मचारी जीव तोडून काम करतायत. मात्र, एकाच खात्यात वर्षानुवर्षे काम काम करणा-यांनी विशेष करुन आरोग्य खात्यात काम करणा-यांना कल्याण डोंबिवलीकरांसाठी काहीच अद्यावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली नाही. त्यामुळे आज कोरोना सारख्या महाभयंकर रोगाशी दोन हात करताना त्यांना त्यांची चूक कळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.