डोंबिवलीतील कोरोनाबाधित गेला होता मित्राच्या घरी, आता त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह

डोंबिवलीतील कोरोनाबाधित गेला होता मित्राच्या घरी, आता त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह

जेव्हा या तरुणाला कोरोनाची लागण झाली हे स्पष्ट झालं होतं. तेव्हा त्यानेच आपल्या मित्रांना आपल्याला कोरोनाची लागण झाली असा मेसेज मोबाईलवर पाठवला होता

  • Share this:

डोंबिवली, 31 मार्च : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबईच्या उपनगरातही कोरोनाच्या रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. डोंबिवलीध्ये कोरोनाबाधित रुग्ण लग्न आणि हळदीला उपस्थित राहिला होता. आता या तरुणाच्या मित्रालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाबाधित तरूण हा तुर्कस्तानहून आल्यानंतर या मित्राच्या घरी गेला होता. तसंच हा मित्रही कोरोनाबाधित तरुणाच्या घरी गेला होता, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सांगण्यात आली आहे. या नव्या रुग्णावरही मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

हेही वाचा -कोरोनामुळे पतीची छुपी बँकॉक ट्रिप झाली उघड, अचानक पोलीस घरी आल्याने पत्नी हैराण

हा तरुण डोंबिवली येथील म्हात्रेनगर येथे हळद आणि पश्चिमेला लग्न समारंभात उपस्थित होता. धक्कादायक म्हणजे,  तुर्कस्तानहून मुबंई परत आल्यावर त्याला होम क्वारंटाइन राहण्यास सांगितलं होतं. मात्र, तसं असून सुद्धा तो लग्नात आणि हळदीमध्ये गेला होता. जेव्हा या तरुणाला कोरोनाची लागण झाली हे स्पष्ट झालं होतं. तेव्हा त्यानेच आपल्या मित्रांना आपल्याला कोरोनाची लागण झाली असा मेसेज मोबाईलवर पाठवला होता.

हेही वाचा -बापाला डोक्यात गोळ्या घालून संपवलं, 3 दिवसांनी मुलाचाही झाला मृत्यू

याच प्रकरणात अजून किती जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यासंदर्भात शोध सुरू होता. त्यात आणखी एका तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

महापौर विनिता राणे होम क्वारंटाइन

या घटनेनंतर पोलिसांनी डोंबिवलीतील मढवी बंगला इथला परिसर पूर्णपणे लॉकडाउन केला आहे. कोरोनाच्या भीतीनं महापौर विनिता राणे यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. या लग्न समारंभाला महापौर आपल्या पतीसह उपस्थित राहिल्या होत्या. तसंच काही लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थिती होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

म्हात्रेनगर इथं 18 मार्च रोजी हळद आणि 19 मार्च रोजी जुनी डोंबिवली ग्राऊंड इथं विवाह समारंभ पार पडला. या समारंभात एक NRI तरुणही उपस्थित होता. ज्याला कोरोनाची लागण झाली होती. या लग्न समारंभात महापौर आपल्या पतीसह अनेक नगरसेवकही उपस्थित होते.

हेही वाचा -नागपूरमध्ये कडकडीत लॉकडाउन अन् चोरांनी फोडले बिअरबार, पाहा हा VIDEO

लग्नाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती. लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी नेमक्या किती जणांना लागण झाली आहे. याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही मात्र, पोलिसांकडून शोध सुरू आहे.

डोंबिवलीत 3 गुन्हे दाखल

या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. साथीचा रोग पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना पसरवल्याच्या आरोपाखाली डोंबिवलीत 3 गुन्हे दाखल केले आहे. यात कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल केला आहे. तसंच जागामालकावर गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम 188, 269, 270, 271 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे कोरोना पसरवलेल्या बदल गुन्हा दाखल करण्याची ठाणे जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे.

First published: March 31, 2020, 4:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading