'तबलिगी' बनले भुकेल्यांसाठी देवदूत, गरजूंना केलं अन्न धान्याचे वाटप

'तबलिगी' बनले भुकेल्यांसाठी देवदूत, गरजूंना केलं अन्न धान्याचे वाटप

रत्नागिरी जिल्ह्यातील महाप्रल गावात तबलिगी जमातीच्या लोकांनी गरजूंना अन्न धान्याचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

मंडणगड, 05 एप्रिल : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  दिल्लीतील निझामुद्दीन इथं झालेल्या कार्यक्रमातून तबलिगी जमातीच्या लोकं देशभरात आपआपल्या राज्यात गेली. पण त्यांच्यामुळेच कोरोनाचा प्रसार झाला असा आरोप केला जात आहे. एकीकडे तबलिगी जमातीवर आरोप केले जात आहे तर दुसरीकडे रत्नागिरीमध्ये वेगळे चित्र पाहण्यास मिळाले आहे.

देशात तबलिगी जमातीच्या लोकांमुळे कोरोनाबाधित लोकांचा आकडा वाढला, असा आरोप केला जात असल्याने संपूर्ण देशात या लोकांबद्धल नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र हीच तबलिगी जमात गोरगरीब लोकांच्या मदतीला धावून आली आहे.

हेही वाचा - डास चावल्यानं होऊ शकतो कोरोना? वाचा काय सांगतात डॉक्टर

रत्नागिरी जिल्ह्यातील महाप्रल गावात तबलिगी जमातीच्या लोकांनी गरजूंना अन्न धान्याचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सीमावर्ती आंबेत, दाभोळे, महाप्रल  भागात गरीब लोकांना अन्न धान्य वाटप करून भुकेल्या लोकांसाठी देवदूत बनली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. तसंच प्रत्येक राज्याने आधीच संचारबंदी लागू केल्यामुळे राज्यांच्या, जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्या आहे. त्यामुळे अनेक राज्यांच्या सीमावर आपल्या गावाकडे जाणारे मजूर, कामगार अडकून पडले आहे. या मजुरांसाठी राज्य सरकारकडून अन्न धान्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा -महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान, बाधितांची संख्या 690 वर, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

परंतु, काही ठिकाणी जिथे सरकारला पोहोचणे अशक्य होतं, अशा ठिकाणी सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहे. रत्नागिरीच्या महाप्रल गावात तबलिगी जमातीने अन्न धान्य वाटप करून आदर्श घडवून दिला आहे.

First published: April 5, 2020, 5:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या