Home /News /maharashtra /

वनस्पती प्या, कोरोनामुक्त व्हा, 'तो' VIDEO व्हायरल करणाऱ्या भोंदूबाबाचे दुकान बंद

वनस्पती प्या, कोरोनामुक्त व्हा, 'तो' VIDEO व्हायरल करणाऱ्या भोंदूबाबाचे दुकान बंद

कोरोना विषाणूवर औषध असल्याचा दावा करून अफवा पसरवू लागल्याची उदाहरणे पुढे येत आहेत.

  पालघर, 31 मार्च :   कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. या व्हायरसवर जगभरातील विविध शास्त्रज्ञ लस आणि औषधाकरिता संशोधन करत असताना त्यावर अजूनही उपाय सापडलेला नाही. परंतु, पालघरमध्ये एका व्यक्तीला कोरोनावर औषध शोधून काढण्याचा दावा चांगलाच महागात पडला आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असताना मात्र अनेक जण कोरोना विषाणूवर औषध असल्याचा दावा करून अफवा पसरवू लागल्याची उदाहरणे पुढे येत आहेत. हेही वाचा - चिंताजनक, 14 नाही तर तब्बल 20 दिवसांनी दिसली कोरोनाची लक्षणं पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील सारशी गावात राहणाऱ्या शशिकांत विजयनाथ पांडे नावाच्या इसमाने कोरोना विषाणूवर उपाय असल्याचा दावा केला होता. पांडे याने एका वनस्पतीच्या वेलीचा रस प्यायल्याने कोरोना पूर्णपणे बरा होतो, असा दावाच ठोकला. एवढंच नाहीतर त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर टाकला होता. हेही वाचा -पाकमध्ये ATMमधून चोरलं सॅनिटायझर, अजब चोरीचा CCTV VIDEO व्हायरल हा व्हिडिओ काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पण, त्याच्या या दाव्यात कोणतेही तथ्य नव्हते. अखेर समाजात अफवा पसरवून गैरसमज पसरविल्याने शशिकांत पांडे यांच्या विरोधात विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 'एप्रिल फूल'च्या नावाखाली अफवा पसरवू नका' दरम्यान, एप्रिल फूलच्या नावाखाली चेष्टा करू नये, विनाकारण देशात संचारबंदी असताना चेष्टाचा विषय केला जाता कामा नये, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.   एप्रिल फूल नावाखाली कोणी चेष्टा केली त्यासंबधी कोणी पोलिसाकडे तक्रार केली तर पोलीस योग्य ती दखल घेतील, पण लोकांनी हा चेष्टेचा विषय करू नये, परिस्थितीच गांभीर्य ओळखा, असं आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या