आरोग्य कर्मचाऱ्यांना हाकललं, पोलिसांवरही दगडफेक; अमरावतीत घडला प्रकार

आरोग्य कर्मचाऱ्यांना हाकललं, पोलिसांवरही दगडफेक; अमरावतीत घडला प्रकार

कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, पोलीस आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे.

  • Share this:

बडनेरा, 06 एप्रिल : महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, पोलीस आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे. परंतु, दुसरीकडे पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

अमरावती शहरालगतच्या बडनेरा येथील अलमास गेट परिसरात काही आरोग्य कर्मचारी हे वाशीम येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या  संपर्कात आलेल्या काही लोकांची तपासणी करायला आले होते.

हेही वाचा - तुमची ही छोटीशी चूक पडेल महागात, व्हाल Coronavirus चे शिकार

परंतु, काही लोकांनी त्यांना त्या ठिकाणाहून हाकलून लावलं. त्याच दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांवर कल्लू नावाचा रिक्षाचालक आणि त्याच्या चार साथीदारांनी पोलिसांवरही दगडफेक केली. मात्र, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

यानंतर पोलिसांनी या परिसरात अधिक पोलीस कुमक पाचारण करून रूट मार्च काढला, या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी कल्लू आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा  -VIDEO: दिवे लावण्याऐवजी तोंडातून काढले आगीचे लोळ, नंतर चेहऱ्यालाच लागली आग

यापूर्वी वाशिम इथं कोरोनाबाधित रुग्ण बडनेरा परिसरात 4 ते 5 दिवस राहिल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 10 जणांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण केले होते.

First published: April 6, 2020, 8:55 AM IST
Tags:

ताज्या बातम्या