'कोरोनाची चाचणी करून घे', संतापलेल्या पत्नीने नवरा आणि सासूला विळ्याने केली मारहाण

'कोरोनाची चाचणी करून घे', संतापलेल्या पत्नीने नवरा आणि सासूला विळ्याने केली मारहाण

पती-पत्नीमध्ये अनेक कारणावरून वाद होताना आपण पाहिले आहे. परंतु, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता गृह'कलह होताना दिसत आहेत.

  • Share this:

बारामती, 28 मार्च : पती-पत्नीमध्ये अनेक कारणावरून वाद होताना आपण पाहिले आहे. परंतु, कोरोना व्हायरसच्या  पार्श्वभूमीवर आता गृह'कलह होताना दिसत आहेत. पत्नीला कोरोनाची वैद्यकीय चाचणी करून घे असा सल्ला देणाऱ्या पत्नीने, सासूला आणि आपल्या पतीला लोखंडी विळ्याने मारहाण करण्याची घटना बारामतीत शहरात घडली आहे.

सध्या जगभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात राहून खबरदारी घेतली जात आहे. परंतु,  पिंपरी येथून आलेल्या आपल्या पत्नीला तू कोरोनाची वैद्यकीय तपासणी करून घे असा सल्ला पतीने आपल्या पत्नीला दिला. परंतु, याचा राग पत्नीला आल्याने चिडून जाऊन पत्नीने आपल्या पतीच्या अंगावर धावून जात मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा - कोरोनाविरोधातील युद्ध हरण्याची भीती वाढली, 2 महिन्यात परदेशातून आले तब्बल15 लाख

आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचं पाहून सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.  'कशाला वाद घालता, भांडू नका' असे म्हणत असतानाच संतापलेल्या पत्नीने आपला मोर्चा सासूकडे वळवला.

पत्नीने घरामध्ये असणाऱ्या लोखंडी विळा उचलला आणि कशाचाही विचार न करता आपल्या सासूला आणि पतीला  मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये पती आणि सासू  जखमी झाले आहे.

हेही वाचा -असा दिसतो भारतात थैमान घालणारा ‘कोरोना’, पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो

घडलेल्या प्रकारानंतर पतीने बारामती शहर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि पत्नी विरुद्ध तक्रार दिली. पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे बारामती शहरातील आंबेडकर वसाहत मध्ये हे कुटुंब राहते.

कुटुंबामध्ये अनेक कारणावरून वाद होतानाचे चित्र समोर आले आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच घरामध्ये गृहकलह निर्माण झाल्याची घटना बारामती शहरात घडली आहे.

First published: March 28, 2020, 10:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या