दारूड्यांचा कहर, फोडले वाईन शॉप आणि चोरून नेले आवडीचे ब्रँड!

दारूड्यांचा कहर, फोडले वाईन शॉप आणि चोरून नेले आवडीचे ब्रँड!

लॉकडाउनमध्ये दारू मिळत नसल्याने तळीरामांनी चक्क वाईन शॉप फोडल्याचा प्रकार समोर आला आहे

  • Share this:

सोलापूर, 01 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दूकानं बंद आहे. तसंच 14 एप्रिलपर्यंत ड्राय डेही घोषित करण्यात आला आहे. आता दारूच मिळत नसल्यामुळे तळीरामांचा संयम सुटत चालला आहे. सोलापुरात दारुड्यांनी चक्क वाईन शॉपचे दुकानच फोडले आहे. तर नागपूरमध्येही अशीच एक घटना घडली आहे.

लॉकडाउनमध्ये दारू मिळत नसल्याने तळीरामांनी चक्क वाईन शॉप फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापुरातील विजापूर रोड येथील गुलमोहर वाईन शॉप नावाचे दुकान आहे. तळीरामांनी थेट या बंद शॉपीवर दरोडा टाकलाय.

हेही वाचा -गावी पोहोचण्यासाठी 2 तरुण आणि 7 तरुणींनी केला 'गनिमी कावा',पोलीसही झाले हैराण

दारूच्या आहारी गेलेल्या काही तळीरामांनी गुलमोहर वाईन शॉप फोडत दारूची चोरी केली. यामध्ये जवळपास ७० हजार रुपयांची दारू तळीरामांनी चोरून नेली आहे.

गमंतीची बाब म्हणजे, तळीरामांनी आपल्या आवडीच्या ब्रँडची दारूच मोठ्या प्रमाणात चोरी केली आहे.  या प्रकरणाची पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिकचा तपास करत आहेत.

खरं पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून राज्य सरकारने राज्यात लॉकडाउन केला आहे. यात फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, असे आदेशही देण्यात आले आहेत. पण, व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना संयम राखणे, कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे असे प्रकार घडत आहे.

नागपूरमध्ये आणखी एक बिअर बार फोडले

तर नागपूरमध्येही  बिअर बारमध्ये चोरी करण्याची दुसरी घटना समोर आली आहे.  नागपूरच्या खराबी रिंगरोडवर आनंद बार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरीची घटना घडली आहे.

लॉकडाउनमुळे शहरात शुकशुकाट आहे. याचाच फायदा उचलत चोरट्यांनी  बारच्या मागिल भागातून प्रवेश केला. त्यानंतर लाखो रुपयांच्या दारूच्या बाटल्या पोत्यात भरून पळ काढला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामध्ये दोन चोरटे दारू चोरत असल्याचं दिसून येत आहे.

याआधीही नागपूरमधील सुविधा बिअरबार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली होती. चोरांनी बंद असलेल्या बिअर बारमध्ये घुसून दोन ते तीन पोती भरून दारूच्या बाटल्या गायब केल्या. या प्रकरणी बारचालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

First published: April 1, 2020, 4:52 PM IST
Tags: wine shop

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading