आडमार्गाने निघाले गावाला, वाटेतच घडला अपघात; दोघांचा जीव धोक्यात!

आडमार्गाने निघाले गावाला, वाटेतच घडला अपघात; दोघांचा जीव धोक्यात!

मुंबई दहिसर येथील वास्तव्य करणारे 10 कामगार भाड्याची गाडी करून राजस्थानकडे निघाले होते.

  • Share this:

पालघर, 28 मार्च : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. आज 4 था दिवस आहे. पण, लोकं जीव धोक्यात घालून बाहेर पडत आहे. राष्ट्रीय महामार्गावरून गुजरात राज्यातील प्रवेशबंदी असताना आडमार्गाने राजस्थान गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चार चाकी वाहनाला अपघात होऊन त्यामधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई दहिसर येथील वास्तव्य करणारे 10 कामगार भाड्याची गाडी करून राजस्थानकडे निघाले होते. दोन लहान मुलं, एक महिलांसह 10 प्रवासी हे कासा सायन - उधवा-वापी अशा आडमार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होते. या गाडीला सायवन सुकटआंबा परिसरात सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले. या जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कासा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुजरातच्या दिशेनं पायी जाणाऱ्या 5 प्रवाशांचा चिरडले

दरम्यान, विरारमधून गुजरातच्या दिशेनं  पायी घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भीषण अपघात झाला आहे.  यात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण  गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा -Lockdown मुळे तरुण घाबरला ना राव! अख्या नॅशनल हायवेवर एकटाच उभा होता आणि...

हे सर्व प्रवाशी सध्या देशात संचारबंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात असताना गुजरात कडील हद्द बंद असल्यानं त्यांना परत पाठवण्यात आलं होतं. परत वसईच्या दिशेनं येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात  एका भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने यांना जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यात तिघे जण हे ट्रकच्या चाकाखाली सापडले गेले. त्यामुळे चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातातील 2 जणांची ओळख पटली असून 5 जणांची मात्र ओळख पटली नाही. ओळख पटलेल्या पैकी कल्पेश जोशी (32) तर दुसरा मयांक भट (34) अशी आहेत. तर इतर 3 जखमींना विरारच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2020 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading