हे घोडेस्वारी करण्याचं कारण संचारबंदीमुळे सोालापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसंच खासगी वाहतूक ही ठप्प झाली आहे. त्यातच सर्वसामान्य नागरिकांनी पेट्रोल देण्यासही बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो लोकांना अनेक दैनंदिन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हेही वाचा - कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाच्या वृद्ध पत्नीचा पुढाकार! अशातच सोलापूर जिल्ह्यातील दर्शनाळ गावच्या मीर अजमोद्दीन पठाण यांनी आपल्या पत्नीच्या औषधासाठी चक्क 50 किलोमीटरचा प्रवास केला. यात विशेष बाब अशी की त्यांनी हा प्रवास आपल्या सांभाळलेल्या घोड्यावरून केला. एकीकडे देशात अनेक ठिकाणी लोक पायी प्रवास करताना पाहायला मिळत आहे. तर मीर पठाण यांनी मात्र, आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर चक्क घोड्यावरुन प्रवास करत आपल्या पत्नीविषयी असलेला जिव्हाळा व्यक्त केला आहे. वास्तविक पाहता मीर अजमोद्दीन पठाण यांची पत्नी मुमताज यांना अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. मात्र, मुमताज यांची औषधे दर्शनाळ आणि अक्कलकोट शहरात उपलब्ध नसल्याने त्यांना सोलापूर शहर गाठावे लागले. हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले हिटमॅनचे आभार, म्हणाले Thank You रोहित ही फरपट एवढ्यावरच न थांबता त्यांना सोलापूर शहरात ही अनेक दुकानं ही फिरावे लागली. वाहनं उपलब्ध न झालेल्या मीर पठाण यांनी घोड्यावरुन प्रवास करताना वाटेत पोलिसांनी देखील त्यांना विचारणा केली. सोबतच माणुसकीचे दर्शन घडवत त्यांना अल्पोपहार ही उपलब्ध करुन दिला. तसंच योग्य त्या मेडिकलमध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन ही केले. दरम्यान, सकाळी 8 वाजता सुरू झालेला हा प्रवास अर्थात फरपट दुपारी 3 पर्यंत सुरूच राहिली. असे असले तरी राज्यशासनाने आणि केंद्र शासनाने ग्रामीण भागातील लोकांसाठी फिरते मेडिकल उपलब्ध करुन दिल्यास लॉकडाउनमध्ये होणारी फरपट थांबण्यास मदत होईल.पत्नीसाठी 'त्या' वृद्धाने केला 50 किलोमीटर घोड्यावरून प्रवास.. अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ गावचे मीर अजमोद्दीन पठाण यांची घोडेस्वारी@News18lokmat@SachinSalve7 @meemilind pic.twitter.com/jYcQf3wNRA
— sagar surawase (@sagarsurawase) March 31, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.