सांगलीत एकाच कुटुंबात आढळले 12 रुग्ण, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 147 वर

सांगलीत एकाच कुटुंबात आढळले 12 रुग्ण, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 147 वर

सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

सांगली, 27 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात आज एकूण 17 नवीन रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये आज नवे 12 रुग्ण आढळले आहे. तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 147 वर पोहोचली आहे.

सांगलीमध्ये आज दुपारी एकाच कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. एकाच कुटुंबामध्ये एकाच वेळी 12 जणांना लागण झाल्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. सांगलीमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ही 23 वर पोहोचली आहे. आतापर्यंत मुंबईपाठोपाठ पुण्याचा नंबर लागत होता. पण, आता सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आज सकाळी नागपुरात आज आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. 4 रूग्ण हे नागपूरमध्ये तर 1 रुग्ण गोंदियामध्ये आढळला आहे.   दिल्लीतून नागपुरात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

हेही वाचा -सरकार आणतंय 'Corona कवच' अॅप, सांगणार तुमच्या आजुबाजुचा कोरोना पेशेंट

गुरुवारी ज्या रुग्णाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता त्याच्याच परिवारातील 3 लोकं आणि एका मित्राला लागण झाल्याचं समोर आले आहे. या पाचही जणांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  कोरोनाबाधित 19 रुग्णांना घरी सोडले

दरम्यान, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीनुसार काम करत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच,

राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून 19 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

First published: March 27, 2020, 3:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या